‘या’ क्रिकेटपटूच्या घरात झाला गॅस सिलिंडरचा स्फोट, पत्नी झाली जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2020 23:23 IST2020-03-31T23:21:21+5:302020-03-31T23:23:13+5:30
या दुर्घटनेत लिटन दास याची पत्नी देवश्री बिश्वास संचिता हीचा हात भाजला आहे.

‘या’ क्रिकेटपटूच्या घरात झाला गॅस सिलिंडरचा स्फोट, पत्नी झाली जखमी
ढाका - बांगलादेशचा सलामीवीर लिटन दासच्या घरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाला आहे. या दुर्घटनेत लिटन दास याची पत्नी देवश्री बिश्वास संचिता हीचा हात भाजला आहे.
देवश्री बिश्वास संचिता यांनी याबाबतची माहिती दिली की, मी स्वयंपाकघरात चहा करत असताना अचानक गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. त्यावेळी स्वयंपाक घरातील ट्रॉलीचा एक तुकडा तुटून माझ्या अंगावर उडाला. त्यावेळी मी चेहरा कसाबसा भाजण्यापासून वाचवला. मात्र, माझा हात या स्फोटात भाजला गेला.
सिलिंडरमध्ये छिद्र असल्याने सिलिंडरचा स्फोट झाल्याची माहिती लिटल दासच्या कुटुंबियांनी दिली आहे. लिटन दास बांगलादेशचा यष्टीरक्षक आहे. काही महिन्यांपूर्वी विश्वचषक संपल्यानंतर त्याने देवश्रीसोबत लग्न केले होते.