कॅनडामध्ये गँगवॉर, ब्रदर्स कीपर्स गँगच्या हरप्रीत उप्पलची हत्या, टोरांटोमध्ये परमवीरचा खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2023 18:35 IST2023-11-13T18:34:58+5:302023-11-13T18:35:24+5:30
Canada Crime News: कॅनडामधील एडमॉन्टन येथे एका शीख व्यक्तीची आणि त्याच्या ११ वर्षीय मुलाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्या प्रकरणामध्ये पोलिसांनी संशयित आणि त्याच्या गाडीचा व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे.

कॅनडामध्ये गँगवॉर, ब्रदर्स कीपर्स गँगच्या हरप्रीत उप्पलची हत्या, टोरांटोमध्ये परमवीरचा खून
कॅनडामधील एडमॉन्टन येथे एका शीख व्यक्तीची आणि त्याच्या ११ वर्षीय मुलाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्या प्रकरणामध्ये पोलिसांनी संशयित आणि त्याच्या गाडीचा व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. या घटनेचा संबंध गँगवॉरसी जोडला जात आहे. मृत हरप्रीत ब्रदर्स कीपर्स नावाच्या टोळीचा सदस्य होता. त्याच्या हत्येमध्ये विरोधी गँगचा हात होता, असं बोललं जात आहे.
यादरम्यान, हरप्रीत उप्पल आणि त्याच्या मुलाच्या हत्येनंतर कॅनडामध्ये गँगवॉरची स्थिती निर्माण झाली आहे. तर टोरांटोमधील युनायटेड नेशन्स गँगचा गँगस्टर परमवीर याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. त्यानंतर पोलीस पूर्णपणे अलर्ट झाले आहेत.
कॅनडातील एडमॉन्टनमध्ये काही दिवसांपूर्वी ४१ वर्षीय हरप्रीत सिंह उप्पल आणि त्याच्या ११ वर्षांच्या मुलाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. दोघांचीही एका शॉपिंग प्लाझाजवळ असलेल्या गॅस स्टेशनजवळ दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
मिळालेल्या माहितीनुसार संशयित काळ्या रंगाच्या बीएमडब्लूमधून आले होते. हे दोघेही त्यांच्या कारमधून बाहेर आले आणि उप्पलच्या पांढऱ्या रंगाच्या कारजवळ गेले. त्यानंतर त्यांनी गोळीबार केला आणि घटनास्थळावरून फरार झाले. पोलिसांनी सांगितले की, पीडितांनी घटनास्थळीच प्राण सोडले. मात्र गाडीत असलेला एक मुलगा मात्र वाचला.