शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 11:11 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदीही G-7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी कनॅनिस्किस येथे पोहोचले आहेत...

इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धाकडे सपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. यातच, जी-७ शिखर परिषदेतून इराणला एक मोठा इशारा देण्यात आला आहे. यावेळच्या जी-७ शिखर परिषदेचे आयोजन कॅनडामध्ये करण्यात आले आहे. जी-७ च्या सर्वोच्च नेत्यांनी संयुक्त निवेदन जारी करत तेहरानला इशारा दिला आहे. 'इराणला कधीही अण्वस्त्रे बनवण्याची परवानगी दिली जाणार नाही,' असे जी-७ नेत्यांचे म्हणणे आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पदेखील या शिखर परिषदेसाठी उपस्थित आहेत.

जी-7 शिखर परिषदेतील नेत्यांनी संबंधित निवेदनात म्हटले आहे, "इस्रायलला आपले संरक्षण करण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्याच्या सुरक्षिततेसाठी आमचा संपूर्ण पाठिंबा आहे. नागरिकांचे संरक्षणही महत्वाचे आहे. इराण हा प्रादेशिक अस्थिरता आणि दहशतवादाचे एक मुख्य कारण आहे. इराण कधीही अण्वस्त्रे बाळगू शकत नाही, यावर आम्ही ठाम आहोत."

"इराण प्रश्न सुटला की शांतता येईल" -अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह सर्वच जी-७ नेत्यांनी मध्यपूर्वेत सुरू असलेल्या तणावावर प्रतिक्रिया दिली आहे. "जर इराणचा प्रश्न सुटला, तर या प्रदेशातील तणाव कमी होऊ शकतो. यात गाझा युद्धविरामाचाही समावेश आहे. 

जी-7 परिषदेसाठी कॅनडाला पोहोचले पंतप्रधान मोदी -पंतप्रधान नरेंद्र मोदीही G-7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी कनॅनिस्किस येथे पोहोचले आहेत. गेल्या दशकात मोदींचा हा पहिलाच कॅनडा दौरा आहे. दरम्यान, पंतप्रधान जागतिक नेत्यांना भेटतील आणि ऊर्जा सुरक्षा आणि तंत्रज्ञानासह महत्त्वाच्या जागतिक मुद्द्यांवर चर्चा करतील. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी सोमवारी सायंकाळी सायप्रसहून कॅनडाला पोहोचले. १६ जून ते १७ जून असे या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधान मोदी सलग सहाव्यांदा जी-७ शिखर परिषदेत सहभागी होत आहेत.

टॅग्स :IranइराणIsraelइस्रायलwarयुद्धAmericaअमेरिकाCanadaकॅनडाIndiaभारतDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पNarendra Modiनरेंद्र मोदी