युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 14:00 IST2026-04-09T14:00:22+5:302026-04-09T14:00:51+5:30

United State & Iran ceasefire : अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या युद्धविरामाला अवघा एक दिवस लोटत नाही तोच या युद्धविरामाचं भवितव्य संकटात सापडलं आहेत.

Future of ceasefire in doubt, Iranian ambassador deletes post on X, will he walk out of talks? | युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   

युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   

अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या युद्धविरामाला अवघा एक दिवस लोटत नाही तोच या युद्धविरामाचं भवितव्य संकटात सापडलं आहेत. तसेच दोन्ही देशांमध्ये पाकिस्तानमधील इस्लामाबाद येथे नियोजित असलेल्या शांतता चर्चेबाबतही अनिश्चितता निर्माण झाली आहे. इराणचेपाकिस्तानमधील राजदूत अमिरी मोगदम यांनी इराणचं शिष्टमंडळ शांतता प्रस्थापित करण्यासाठीच्या चर्चेसाठी पाकिस्तानमध्ये येणार असल्याची माहिती एक्सवरील पोस्टमधून दिली होती. मात्र मोगदम यांनी आता ही पोस्ट हटवल्याने शांतता चर्चेबाबत इराणकडून देण्यात आलेले हे मोठे संकेत असल्याचे मानले जात आहे.

अमेरिकेसोबत चर्चा करण्यासाठी इराणचं शिष्टमंडळ हे पाकिस्तानची राजधानी असलेल्या इस्लामाबाद येथे येणार आहे, अशा आशयाची पोस्ट पाकिस्तानमधील इराणाचे राजदूत रजा अमिरी मोघदम यांनी एक्सवर केली होती. मात्र काही वेळातच त्यांनी ही पोस्ट हटवली आहे. 

मोघदम म्हणाले होते की, लेबनानमध्ये इस्राइलकडून युद्धविरामाचं उल्लंघन होत असतानाही इराणी शिष्टमंडळ चर्चेसाठी गुरुवारी रात्री इस्लामाबाद येथे येत आहे. मोघदम यांनी केलेलं हे विधान इराणी संसदेचे सभापती मोहम्मद बाघर गालिबफ यांनी केलेल्या विधानाच्या अगदी उलट होते. गालिबफ यांनी शस्त्रसंधीच्या अशा उल्लंघनांदरम्यान चर्चा करणे अतार्किक असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता मोघदम यांनी या चर्चेसंदर्भातील पोस्ट डिलिट केल्याने युद्धविराम आणि शांतता चर्चेबाबतच्या इराणच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. 

Web Title : ईरान-अमेरिका युद्धविराम अनिश्चित, ईरान ने पोस्ट हटाई; क्या वार्ता संदिग्ध?

Web Summary : ईरान-अमेरिका युद्धविराम अनिश्चितता का सामना कर रहा है। एक ईरानी राजनयिक ने पाकिस्तान में शांति वार्ता के बारे में एक पोस्ट हटा दी, जिससे युद्धविराम उल्लंघन के बाद ईरान की प्रतिबद्धता पर संदेह पैदा हो गया। इससे पहले के बयानों का खंडन होता है, जिससे संवाद के भविष्य पर संदेह होता है।

Web Title : Iran-US ceasefire uncertain as Iran removes post; talks in doubt?

Web Summary : Iran-US ceasefire faces uncertainty. An Iranian diplomat deleted a post about peace talks in Pakistan, raising doubts about Iran's commitment after ceasefire violations. This contradicts earlier statements, casting a shadow on the dialogue's future.