शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
2
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
3
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
4
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
5
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
6
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
7
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
8
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
9
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
10
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
11
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
12
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
13
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
14
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
15
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
16
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
17
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
18
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
19
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
20
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!

राष्ट्राध्यक्षांच्या उचलबांगडीसाठी मोर्चा

By admin | Updated: March 16, 2015 23:47 IST

लाखो लोकांनी ब्राझीलमध्ये निदर्शने केली. पेट्रोब्रास नामक तेल कंपनीत झालेल्या कथित भ्रष्टाचारात रौसेफ सहभागी असल्याचा आरोपही आंदोलकांनी केला.

ब्राझिलिया : राष्ट्राध्यक्ष दिल्मा रौसेफ यांना पदच्युत करण्याची मागणी करीत लाखो लोकांनी ब्राझीलमध्ये निदर्शने केली. पेट्रोब्रास नामक तेल कंपनीत झालेल्या कथित भ्रष्टाचारात रौसेफ सहभागी असल्याचा आरोपही आंदोलकांनी केला.रौसेफ ‘पेट्रोब्रास’च्या प्रमुख असतानाच कंपनीत सर्वाधिक भ्रष्टाचार झाल्याचा विरोधकांचा दावा आहे. मात्र, राष्ट्राध्यक्ष दिल्मा रौसेफ यांनी भ्रष्टाचारात आपली कोणतीही भूमिका नसल्याचे स्पष्ट केले. अ‍ॅटॉर्नी जनरलच्या तपासातही त्या निर्दोष आढळल्या होत्या. कथितरीत्या लाच घेतल्याच्या अधिकतर प्रकरणात सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांची संख्या लक्षणीय आहे.सर्वसामान्य जनतेने हे आंदोलन उभे केले आहे. लोक रस्त्यावर उतरले आहेत. कारण त्यांना हिंसा नको, भ्र्रष्टाचार, कुशासन यांचा कंटाळा आला आहे. त्यांना एक नवा ब्राझील हवा आहे, अशी प्रतिक्रिया एका आंदोलक महिलेने व्यक्त केली. दरम्यान, सरकारने जनउद्रेकानंतर देशातील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.दरम्यान, विरोधी पक्षांनी राष्ट्राध्यक्षांविरोधात मोर्चा काढला असतानाच रौसेफ यांच्या समर्थनार्थही लाखो लोक रस्त्यावर उतरले होते. पाच महिन्यांपूर्वीच येथे राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक झाली होती.आंदोलकांच्या हातात ब्राझीलचा झेंडा होता आणि त्यांनी राष्ट्रीय फुटबॉल संघाचा पिवळ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केला होता.२२ राज्यांसह राजधानी ब्राझिलिया येथे आंदोलन1 ०५ लाख लोकांनी साओ पाओलोतल्या आंदोलनात भाग घेतला. हा विरोधकांचा बालेकिल्ला आहे.2 ४०,००० लोकांनी ब्राझिलियात काँग्रेससमोरील आंदोलनात भाग घेतला.3 २५,००० लोक रिओ दी जिनेरिओतील आंदोलात सहभागी झाले.4 १० लाख लोकांनी आंदोलनात भाग घेतल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.व्हेनेझुएलाच्या मार्गाने?४सामान्य लोकांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत असून परिस्थिती अशीच राहिल्यास ब्राझीलचे आगामी काळात व्हेनेझुएला होण्यास वेळ लागणार नाही, अशी भीती या आंदोलनात सहभागी झालेल्या एका व्यक्तीने व्यक्त केली. नवी पावले उचलणे गरजेचेकायदामंत्री जोजे एडुआर्डो कार्डोजो यांनी सांगितले की, ‘हे आंदोलन लोकशाहीचे रूप आहे. शांततापूर्ण आणि कायदेशीर मार्गाने आंदोलन पार पडले. कोणताही दबाव न टाकता विचार मांडणे ही ब्राझीलच्या लोकांची पद्धती आहे. आंदोलनामुळे भ्रष्टाचाराविरोधात ठोस उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित होते.’