अंतराळातून पृथ्वीवरील वाद क्षुल्लक वाटतात! अंतराळवीर सुनीता विल्यम्स 'नासा'तून निवृत्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 07:09 IST2026-01-22T07:08:29+5:302026-01-22T07:09:00+5:30

आपण सर्व एक आहोत हा बदललेला जीवनाचा दृष्टिकोन मिळाल्याचे त्यांनी सांगितले

From space, disputes on Earth seem trivial! Astronaut Sunita Williams retires from NASA | अंतराळातून पृथ्वीवरील वाद क्षुल्लक वाटतात! अंतराळवीर सुनीता विल्यम्स 'नासा'तून निवृत्त

अंतराळातून पृथ्वीवरील वाद क्षुल्लक वाटतात! अंतराळवीर सुनीता विल्यम्स 'नासा'तून निवृत्त

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: जेव्हा तुम्ही अंतराळातून पृथ्वीकडे एक ‘अखंड ग्रह’ म्हणून पाहता, तेव्हा मानवामधील वाद किंवा मतभेद अतिशय क्षुल्लक व हास्यास्पद वाटतात, असे प्रतिपादन अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी केले. नासामधून निवृत्त ६० वर्षीय सुनीता विल्यम्स सध्या भारत दौऱ्यावर असून, नवी दिल्लीतील अमेरिकन सेंटर येथे आयोजित ‘आइज ऑन द स्टार्स, फिट ऑन द ग्राउंड’ या कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्य, अंतराळातील कचरा, मोहिमा यासारख्या प्रश्नांना उत्तरे दिली. 

घेतली नासातून निवृत्ती

सुनीता विल्यम्स यांनी नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन (नासा) मधून निवृत्ती घेतली. २७ डिसेंबर २०२५ रोजी त्यांनी आपल्या २७ वर्षांच्या गौरवशाली कारकीर्दीचा निरोप घेतला. 

बदललेला जीवनाचा दृष्टिकोन, आपण सर्व एक आहोत

सुनीता म्हणाल्या की, अंतराळाने दृष्टिकोन पूर्णपणे बदलला. अवकाशात सुरुवातीला आपण आपले घर शोधतो. वडील भारतीय, आई स्लोव्हेनियन असल्याने मी सुरुवातीला या जागा शोधल्या. परंतु हळूहळू जाणीव होते की, आपली संपूर्ण पृथ्वी हाच एक जिवंत ग्रह आहे. तिथून बदलणारे ऋतू, समुद्राचे बदलणारे रंग आणि बर्फाचे थर पाहताना आपण सर्व एक आहोत याची प्रचीती येते.

विक्रमी कारकीर्द आणि शेवटची मोहीम

  • एकूण वास्तव्य : त्यांनी अंतराळात ६०८ दिवस व्यतीत केले असून, नासाच्या यादीत त्या दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
  • स्पेस वॉक : ६२ तास ६ मिनिटांचा एकूण ९ वेळा स्पेस वॉक करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे.
  • दीर्घकालीन वास्तव्य : त्यांची शेवटची मोहीम केवळ ८ दिवसांची होती. मात्र, बोइंग स्टारलाइनरमधील तांत्रिक बिघाडामुळे त्यांना ९ महिने अवकाशात थांबावे लागले.

Web Title : सुनीता विलियम्स नासा से सेवानिवृत्त: अंतरिक्ष से पृथ्वी के झगड़े लगते हैं तुच्छ!

Web Summary : अंतरिक्ष से, मानवीय झगड़े महत्वहीन लगते हैं, नासा की सेवानिवृत्त अंतरिक्ष यात्री सुनीता विलियम्स ने भारत यात्रा के दौरान कहा। उन्होंने पृथ्वी को एक जीवित ग्रह के रूप में देखने से प्राप्त एकता और बदले हुए दृष्टिकोण पर जोर दिया। विलियम्स ने अंतरिक्ष में 608 दिन बिताए और 27 वर्षों के बाद सेवानिवृत्त हुईं।

Web Title : Sunita Williams retires from NASA: Earthly conflicts seem trivial from space!

Web Summary : From space, human conflicts appear insignificant, says retired NASA astronaut Sunita Williams during her India visit. She emphasized unity and changed perspectives gained from observing Earth as a whole, living planet. Williams spent 608 days in space and retired after 27 years.