भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 15:00 IST2025-09-10T14:59:10+5:302025-09-10T15:00:18+5:30

लोक रस्त्यावर उतरले असून इमॅन्युएल मॅक्रॉन सरकारच्या धोरणांविरुद्ध मोठं आंदोलन करत आहेत.

france paris protests macron government unrest after nepal gen z protests | भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

नेपाळनंतर आता फ्रान्सच्या रस्त्यावर सरकारविरुद्ध लोकांचा रोष दिसून येत आहे. लोक रस्त्यावर उतरले असून इमॅन्युएल मॅक्रॉन सरकारच्या धोरणांविरुद्ध मोठं आंदोलन करत आहेत. राजधानी पॅरिसमध्ये तोडफोड, जाळपोळ होत आहे. काही लोक पोलिसांवर दगडफेक करत आहेत.

फ्रान्समधील लोक राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याविरोधात निदर्शनं करत आहेत. लोकांचे म्हणणं आहे की, मॅक्रॉन सरकारने लोकांचं जीवनमान सुधारण्यासाठी काहीही केलेलं नाही आणि त्यांचं आर्थिक व्यवस्थापन खूपच खराब झालं आहे.

सोशल मीडियावर Block Everything या आवाहनानंतर ही निदर्शनं सुरू झाली आणि आता लोक संघटित पद्धतीने आंदोलन करण्यासाठी बाहेर पडले आहेत. हजारो पोलीस आंदोलनकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु सध्या त्यांच्यावर नियंत्रण मिळवणं कठीण झालं आहे.

Video - परिस्थिती भीषण! जे दिसलं, ते सर्वच लुटलं... नेपाळमध्ये Gen-Z आंदोलनकर्त्यांचा धुडगूस

संपूर्ण फ्रान्समध्ये लोक आंदोलन करत आहेत आणि त्यांनी वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे. कचराकुंडी जाळली जात आहेत. विविध ठिकाणी पोलीस आणि आंदोलन करणाऱ्या लोकांमध्ये संघर्ष होत आहेत. आंदोलक प्रत्येक गोष्ट थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशभरात सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत जेणेकरून सर्वकाही पुन्हा सुरू करता येईल. याच दरम्यान काही आंदोलन करणाऱ्या लोकांना अटक देखील करण्यात आली आहे. 

Web Title: france paris protests macron government unrest after nepal gen z protests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.