Four Indian family members shot dead in US | अमेरिकेत भारतीय कुटुंबातील चौघांची गोळ्या घालून हत्या
अमेरिकेत भारतीय कुटुंबातील चौघांची गोळ्या घालून हत्या

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या आयोवा राज्यात भारतीय वंशाचे आयटी कर्मचारी व त्यांच्या पत्नी, दोन मुलांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.
चंद्रशेखर सुंकारा (४४), त्यांच्या पत्नी लावण्या (४१), त्यांची १५ व १० वर्षांची दोन मुले यांचा मृतात समावेश आहे. चंद्रशेखर हे चंद्रा नावाने ओळखले जात होते. डिपार्टमेंट आॅफ पब्लिक सेफ्टीमध्ये ते आयटी कर्मचारी होते. त्यांच्या घरी पोलिसांनी सकाळी १० वाजता धाव घेतली तेव्हा या चार जणांचे मृतदेह घरात आढळून आले. त्यांच्या शरीरावर गोळ्या झाडल्याच्या खुणा दिसून आल्या. 


Web Title: Four Indian family members shot dead in US
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.