Imran Khan: इम्रान खान यांची प्रकृती बिघडली, मध्यरात्री तुरुंगातून रुग्णालयात हलवलं, काय झालं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 10:23 IST2026-02-24T10:20:14+5:302026-02-24T10:23:06+5:30

Imran Khan Hospitalized: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना आज पहाटे १२:३० वाजता कडेकोट बंदोबस्तात आदियाला तुरुंगातून पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस येथे नेण्यात आले.

Former Pakistan PM Imran Khan Rushed to PIMS from Adiala Jail for Urgent Eye Treatment | Imran Khan: इम्रान खान यांची प्रकृती बिघडली, मध्यरात्री तुरुंगातून रुग्णालयात हलवलं, काय झालं?

Imran Khan: इम्रान खान यांची प्रकृती बिघडली, मध्यरात्री तुरुंगातून रुग्णालयात हलवलं, काय झालं?

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना आज पहाटे १२:३० वाजता कडेकोट बंदोबस्तात आदियाला तुरुंगातून पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस येथे नेण्यात आले. इम्रान खान यांच्या उजव्या डोळ्यातील दृष्टीबाबत गंभीर समस्या निर्माण झाल्याने त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, इम्रान खान हे उजव्या डोळ्याच्या सेंट्रल रेटिनल व्हेन ऑक्लुजन या आजाराने ग्रस्त आहेत. या उपचाराचा भाग म्हणून त्यांना अँटी-VEGF इंजेक्शनचा दुसरा डोस देण्यात आला. रावळपिंडी येथील अल शिफा आय हॉस्पिटलचे रेटिना तज्ज्ञ डॉ. नदीम कुरेशी आणि पीआयएमएसचे नेत्ररोग विभाग प्रमुख डॉ. मुहम्मद आरिफ खान यांच्या देखरेखीखाली पीआयएमएसच्या ऑपरेशन थिएटरमध्ये ही प्रक्रिया पार पडली.

इम्रान खान गेल्या वर्षी जुलैपासून उच्च रक्तदाबाच्या त्रासाने त्रस्त आहेत. डोळ्यावर उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांनी त्यांची ईसीजी आणि इको चाचणी करण्यात आली. रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, या चाचण्यांचे अहवाल सामान्य आहेत. मात्र, केवळ डोळ्याच्या इंजेक्शनसाठी हृदयाशी संबंधित या चाचण्या करण्याची गरज का भासली? याचे स्पष्टीकरण पीआयएमएस प्रशासनाने दिलेले नाही, ज्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.

या महिन्याच्या सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयाने इम्रान खान यांच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी बॅरिस्टर सलमान सफदर यांची अॅमिकस क्युरी म्हणून नियुक्ती केली होती. त्यावेळी सफदर यांनी धक्कादायक माहिती दिली होती की, इम्रान खान यांना उजव्या डोळ्याने केवळ १५ टक्के दिसत आहे. दरम्यान, १६ फेब्रुवारी रोजी सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार, २४ जानेवारीला दिलेल्या पहिल्या इंजेक्शननंतर त्यांच्या स्थितीत सुधारणा होत असल्याचा दावा सरकारने केला.

इम्रान खान यांना तुरुंगातून रुग्णालयात हलवण्यात यावे, यासाठी त्यांचा पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफकडून देशभर निदर्शने करण्यात आली होती. सुरुवातीला सरकारने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यास नकार दिला. परंतु, प्रकृतीचे गांभीर्य पाहून अखेर मध्यरात्री ही हालचाल करण्यात आली. आवश्यक उपचार आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर खान यांना पुन्हा डिस्चार्ज देऊन तुरुंगात नेण्यात आले. 

Web Title : इमरान खान की तबीयत बिगड़ी, आधी रात को जेल से अस्पताल पहुंचाया गया।

Web Summary : इमरान खान, दाहिनी आंख की बीमारी से पीड़ित, को तुरंत जेल से पाकिस्तान के एक अस्पताल में ले जाया गया। विशेषज्ञ देखरेख में उन्हें एंटी-वीईजीएफ इंजेक्शन सहित उपचार मिला। खान को उच्च रक्तचाप की समस्या है, और परीक्षण सामान्य होने के बावजूद, आंख के इलाज से पहले हृदय संबंधी जांच का कारण स्पष्ट नहीं है। बाद में उन्हें वापस जेल भेज दिया गया।

Web Title : Imran Khan's health worsens, rushed to hospital from jail.

Web Summary : Imran Khan, suffering from a right eye condition, was urgently moved from jail to a hospital in Pakistan. He received treatment, including an anti-VEGF injection, under specialist supervision. Khan has a history of high blood pressure, and while tests were normal, the reason for heart-related checks before eye treatment remains unclear. He was later discharged back to jail.