"पती माझ्यासोत जबरदस्ती..."; इंग्लंडचे माजी खासदार अँड्रयू ग्रिफिथ्स यांच्यावर, माजी खासदार पत्नीचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 15:53 IST2025-07-21T15:52:20+5:302025-07-21T15:53:16+5:30

केट यांच्या या आरोपांमुळे आता सोशल मीडियापासून ते ब्रिटिश संसदेपर्यंत वाद सुरू झाला आहे.

Former MP Andrew Griffiths ex wife Kate Kniveton makes serious allegations against him says sexually assaulted me when i was sleeping | "पती माझ्यासोत जबरदस्ती..."; इंग्लंडचे माजी खासदार अँड्रयू ग्रिफिथ्स यांच्यावर, माजी खासदार पत्नीचा गंभीर आरोप

"पती माझ्यासोत जबरदस्ती..."; इंग्लंडचे माजी खासदार अँड्रयू ग्रिफिथ्स यांच्यावर, माजी खासदार पत्नीचा गंभीर आरोप

इंग्लंडच्या माजी खासदार केट नायवेटन (Kate Kniveton) यांनी आपल्या वैवाहिक जीवनात झालेल्या अत्याचारांसंदर्भात पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या भाष्य केले आहे. त्यांनी त्यांचे एक्स पती तथा कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे खासदार अँड्र्यू ग्रिफिथ्स (Andrew Griffiths) यांच्यावर बलात्कार, शारीरिक आणि मानसिक हिंसाचार तथा नवजात मुलीसोबत अयोग्य वर्तन केल्याचा गंभीर आरोप केले आहेत. केट यांच्या या आरोपांमुळे आता सोशल मीडियापासून ते ब्रिटिश संसदेपर्यंत वाद सुरू झाला आहे.

ITV की डॉक्यूमेंट्री ‘Breaking the Silence: Kate’s Story’ मध्ये नायवेटन यांनी अँड्रयू ग्रिफिथ्ससंदर्भात भाष्य  केले आहे. त्या म्हणाल्या, “हे सर्व मी झोपेत असताना सुरू व्हायचे. मी उठायचे आणि तो माझ्यासोबत सेक्स करायला सुरुवात करायचा... कधी कधी मी दुर्लक्ष करायचे, मात्र कधी कधी मी रडायचे. असे झाल्यास, अनेकवेळा तो थांबायचा. पण त्याचा मूड खराब व्हायचा. मला आठवते की, त्याने मला बेडडवरच लाथ मारली होती. मी दुसऱ्या रूममध्ये जायचे आणि रात्रभर स्वतःला कोंडून घ्यायचे अथवा घराबाहेर निघून जायचे. 

१० वर्षांचा त्रास आणि ५ वर्षांचा कायदेशीर छळ -
आपला १० वर्षांच्या वैवाहिक जीवनात मानसिक आणि शारीरिक छळ झाला आणि वेगळे झाल्यानंतरही, ग्रिफिथ्सने पाच वर्षे कायदेशीर प्रक्रियेद्वारे आपला छळ केला, अस दावाही नायवेटन यांनी केला आहे. या शिवाय, "लोकांना वाटते की हे फक्त गरीब किंवा अशिक्षित वर्गातच घडते. मात्र असे नाही, घरगुती हिंसाचार प्रत्येक वर्गात होऊ शकतो. जेव्हा मी खासदार झाले, तेव्हा घरगुती हिंसाचाराच्या बळींचा आवाज बनण्याची शपथ घेतली होती," असेही नायवेटन यांनी म्हटले आहे.


 

Web Title: Former MP Andrew Griffiths ex wife Kate Kniveton makes serious allegations against him says sexually assaulted me when i was sleeping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.