बांगलादेश: माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे निधन? पोस्ट व्हायरल झाल्यावर पक्षाकडून मोठी अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 15:06 IST2025-10-30T15:05:47+5:302025-10-30T15:06:42+5:30

Sheikh Hasina death rumours: फेसबुक, यूट्यूब आणि इतर सोशल मीडिया साइट्सवर फोटो कार्ड आणि शोक संदेश शेअर करण्यात आले

former bangladesh pm sheikh hasina passes away rumours news awami league political party gives information after post goes viral | बांगलादेश: माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे निधन? पोस्ट व्हायरल झाल्यावर पक्षाकडून मोठी अपडेट

बांगलादेश: माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे निधन? पोस्ट व्हायरल झाल्यावर पक्षाकडून मोठी अपडेट

Sheikh Hasina death rumours: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या आजारपणाची आणि मृत्यूची अफवा सोशल मीडियावर वेगाने पसरली आहे. फेसबुक, यूट्यूब आणि इतर सोशल मीडिया पेजसारख्या सोशल मीडिया साइट्सवर फोटो कार्ड आणि शोक संदेश शेअर करण्यात आले आहेत. परंतु शेख हसीनांचा पक्ष अवामी लीगने, हे वृत्त पूर्णपणे खोटे सांगून फेटाळून लावले. तसेच, हा प्रकार जाणूनबुजून केलेले षडयंत्र असल्याचा आरोपी त्यांनी केला. पक्षाच्या नेत्यांचे म्हणणे आहे की जेव्हा या अफवा पसरवल्या जात होत्या, तेव्हा शेख हसीना स्वतः पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करत होत्या.

अफवा पसरायला कशी सुरुवात झाली?

या अफवा ब्रिटिश खासदार आणि शेख हसीना यांची भाची ट्यूलिप रिझवाना सिद्दीकीच्या फेसबुक पोस्टवरून सुरू झाल्याचे म्हटले जाते. २५ ऑक्टोबर रोजी तिने अकाउंटवर लिहिले होते, "मामी (शेख हसीना) थोडी आजारी आहे. कृपया त्यांच्यासाठी प्रार्थना करा." नंतर मात्र ही पोस्ट दिसेनाशी झाली. महत्त्वाची बाब म्हणजे, ट्यूलिप सिद्दीकीच्या अधिकृत वेबसाइटवर फक्त तिच्या इंस्टाग्राम आणि एक्स (ट्विटर) अकाउंटचा उल्लेख आहे, तिच्या फेसबुक अकाउंटचा उल्लेख नाही. नंतर अवामी लीगच्या नावाने आणि सरचिटणीस ओबैदुल कादर यांची स्वाक्षरी असलेला एक शोक संदेशही सोशल मीडियावर फिरला. शेख हसीनांचा अंत्यसंस्कार दिल्लीच्या जामा मशिदीत होईल, अशा अफवाही पसरल्या आणि बांगलादेशमध्ये प्रार्थना सेवांसाठी आवाहन करण्यात आले.

पक्षाने हसीनांबद्दलच्या अफवा नाकारल्या...

थोड्याच वेळात, अवामी लीगच्या अधिकृत फेसबुक पेजने हे विधान पूर्णपणे बनावट असल्याचे स्पष्ट केले. अवामी लीगच्या फेसबुक पेजवरून शेख हसीना यांचा एक ऑडिओ मेसेजही शेअर करण्यात आला, ज्यामध्ये त्या असे म्हणताना ऐकू आल्या की, माझ्याबद्दल खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. मी आजारी का पडू? मी पूर्णपणे निरोगी आहे, मला माझा देश वाचवायचा आहे." मात्र, या ऑडिओची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली नाही. दरम्यान, अवामी लीग पक्षाच्या नेत्यांचे म्हणणे आहे की ही संपूर्ण मोहीम राज्य पुरस्कृत अफवा आहे.

Web Title: former bangladesh pm sheikh hasina passes away rumours news awami league political party gives information after post goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.