युक्रेन युद्धानंतर पहिल्यांदाच! 'आता आमची बारी', रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारत दौऱ्यावर येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 17:19 IST2025-03-27T17:18:59+5:302025-03-27T17:19:17+5:30

भारताचे रशियाशी दशकांपासूनचे संबंध आहेत. रशिया हा भारताला संरक्षण उपकरणांचा एक प्रमुख पुरवठादार देखील आहे. याशिवाय, युक्रेन युद्धावरून पाश्चात्य निर्बंधांना तोंड देत असलेल्या रशियानेही भारताला सवलतीच्या दरात तेल विकले आहे.

For the first time since the Ukraine war! 'Now it's our turn', Russian President vladimir putin to visit India | युक्रेन युद्धानंतर पहिल्यांदाच! 'आता आमची बारी', रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारत दौऱ्यावर येणार

युक्रेन युद्धानंतर पहिल्यांदाच! 'आता आमची बारी', रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारत दौऱ्यावर येणार

युक्रेन युद्धानंतर अमेरिकेच्या निर्बंधांमुळे फारसे परदेश दौऱ्यावर न गेलेले रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन हे भारत दौऱ्यावर येणार आहेत. युद्ध सुरु झाल्यानंतर पहिल्यांदाच पुतीन हे भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांनी ही माहिती दिली आहे. 

पुतीन भारत दौऱ्यावर येणार असून त्याची तयारी सुरु असल्याचे ते म्हणाले. या दौऱ्याच्या तारखांची माहिती त्यांनी दिलेली नाही. अमेरिका आणि रशियात झालेल्या युक्रेन डीलनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. रशियन इंटरनॅशनल अफेयर्स कौन्सिल (RIAC) द्वारे 'रशिया आणि भारत नवीन द्विपक्षीय अजेंडाच्या दिशेने' या शीर्षकाची एक परिषद आयोजित करण्यात आली होती. याला लावरोव व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते. 

पुतिन यांनी भारतीय सरकारच्या प्रमुखांचे निमंत्रण स्वीकारले असे लावरोव यांनी म्हटल्याचे सरकारी वृत्तसंस्था TASS ने म्हटले आहे. गेल्या वर्षी पंतप्रधान मोदी पुन्हा निवडून आल्यानंतर त्यांनी रशियाचा पहिला परदेश दौरा केला होता. आता आमची वेळ आहे, असे ते म्हणाले. 

पंतप्रधान मोदी जुलै २०२४ मध्ये रशियाला भेट दिली होती. यावेळी मोदींनी पुतिन यांना भारत भेटीचे आमंत्रण दिले होते. परंतू, अमेरिकेशी बिघडलेले संबंध आणि युद्ध सुरु असल्याने पुतीन यांनी भारत दौरा विचारात घेतला नव्हता. 

भारताचे रशियाशी दशकांपासूनचे संबंध आहेत. रशिया हा भारताला संरक्षण उपकरणांचा एक प्रमुख पुरवठादार देखील आहे. याशिवाय, युक्रेन युद्धावरून पाश्चात्य निर्बंधांना तोंड देत असलेल्या रशियानेही भारताला सवलतीच्या दरात तेल विकले आहे. तसेच भारताने युक्रेन संघर्षावर तटस्थ भूमिका कायम ठेवली आहे. रशियाचा निषेध करणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या ठरावांपासून भारताने स्वतःला दूर ठेवले आहे आणि पुतिन यांच्यावर सार्वजनिक टीका करणे देखील टाळले आहे.

Web Title: For the first time since the Ukraine war! 'Now it's our turn', Russian President vladimir putin to visit India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.