अफगाणिस्तानातल्या मशिदीत दहशतवाद्यानं घडवला आत्मघातकी स्फोट, 30 जणांचा मृत्यू झाल्याची भीती
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2017 20:59 IST2017-10-20T20:31:10+5:302017-10-20T20:59:24+5:30
अफगाणिस्तानची राजधानी काबूल पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्यानं हादरली आहे. काबूलमधल्या एका शिया मशिदीत दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला आहे. या गोळीबारात नमाज पठण करण्यासाठी आलेल्या 30हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं दिली आहे.

अफगाणिस्तानातल्या मशिदीत दहशतवाद्यानं घडवला आत्मघातकी स्फोट, 30 जणांचा मृत्यू झाल्याची भीती
काबूल- अफगाणिस्तानची राजधानी काबूल पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्यानं हादरली आहे. काबूलमधल्या एका शिया मशिदीत दहशतवाद्यानं अंदाधुंद गोळीबार केल्यानंतर आत्मघातकी बॉम्बस्फोट घडवून आणला आहे. या स्फोटात नमाज पठण करण्यासाठी आलेल्या 30हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं दिली आहे. स्थानिक वृत्तवाहिन्यांच्या मते, घोर प्रांतातील इमाम झमान मशीद परिसरातील स्फोट झाला आहे. आत्मघातकी दहशतवाद्यानं काबूलमधल्या मशिदीत प्रवेश केला आणि अंदाधुंद गोळीबार करत बॉम्बस्फोट घडवून आणला, अशी माहिती काबूल क्राइम ब्रँचचे अधिकारी मोहम्मद सलीम अल्मास यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीसुद्धा इसिसच्या दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानमधल्या शिया मुस्लिमांवर हल्ले केले होते. या हल्ल्याची अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेनं जबाबदारी स्वीकारलेली नाही.
Suicide bomber kills at least 30 at mosque in Afghan capital Kabul https://t.co/KTlU0sJOI5
— Reuters World (@ReutersWorld) October 20, 2017
(सविस्तर वृत्त लवकरच)