महिला शिक्षिकेवर शेजाऱ्याची होती वाईट नजर, रेप केला आणि संपवलं तिचं जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2021 13:10 IST2021-11-17T13:08:19+5:302021-11-17T13:10:52+5:30

ही व्यक्ती एका हत्येप्रकरणी तुरूंगातून सुटून परत आली होती. पोलिसांनी आरोपीला अटक केली आणि कोर्टात या केसची सुनावणी  सुरू आहे.

Female teacher raped and murdered by neighbour in Spain | महिला शिक्षिकेवर शेजाऱ्याची होती वाईट नजर, रेप केला आणि संपवलं तिचं जीवन

महिला शिक्षिकेवर शेजाऱ्याची होती वाईट नजर, रेप केला आणि संपवलं तिचं जीवन

स्पेनमध्ये एका महिला शिक्षिकेवर रेप केल्याची आणि तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिक्षिकेच्या शरीरावर ४० पेक्षा जास्त वार केले गेले. हे कृत्य शिक्षिकेच्या शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने केली. ही व्यक्ती एका हत्येप्रकरणी तुरूंगातून सुटून परत आली होती. पोलिसांनी आरोपीला अटक केली आणि कोर्टात या केसची सुनावणी  सुरू आहे.

बाजारातून येताना केलं होतं अपहरण

'द सन' च्या रिपोर्टनुसार, २६ वर्षीय लौरा लुएल्मोला तिचा शेजारी बर्नार्डो मोंटोयाने ती बाजारातून घरी परत येत असताना किडनॅप केलं होतं. आरोपीने आधी तिच्यावर हल्ला केला नंतर तिला खेचत घरात घेऊन गेला. तिथे त्याने तिच्यावर रेप केला आणि त्यानंतर तिची हत्या केली.

आधीही केली होती एका महिलेची हत्या

आर्ट शिक्षिका लौरा लुएल्मोने घटनेच्या काही दिवसांआधीच आपल्या बॉयफ्रेन्डला सांगितलं होतं की, शेजारी बर्नार्डो मोंटोया तिला घाणेरड्या नजरेने बघत होता. बर्नार्डोला एका वयोवृद्ध महिलेची लूट करणे आणि तिची हत्या करण्याप्रकरणी त्याला अटक झाली होती. तुरूंगातून बाहेर आल्यावर त्याने शिक्षिकेला आपली शिकार केलं. पोलिसांनुसार, लौराला जबरदस्ती आपल्या घरात नेलं आणि त्यानंतर तिच्यावर रेप करून तिची हत्या केली. त्याने तिच्या शरीरावर एकापाठी एक ४० वार केले.

शिक्षिकेची हत्या केल्यावर आरोपीने तिच्या मृतदेहाचा विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. शोधानंतर पाच दिवसांनी शिक्षिकेचा मृतदेह सापडला. आरोपीने चौकशीदरम्यान आपला गुन्हा मान्य केला. तो काही वेळाने तिचा जीव गेला का नाही हे बघण्यासाठी त्या ठिकाणी गेला होता. तेव्हा त्याला लक्षात आलं की, तिचा श्वास सुरू आहे. त्यानंतर त्याने तिच्या डोक्यावर दगड मारला आणि तेथून पळाला.
 

Web Title: Female teacher raped and murdered by neighbour in Spain