आईने मुलासाठी जमवून ठेवली होती लाखोंची संपत्ती, बापाने चोरून ड्रग्स अन् दारूत उडवले सगळे पैसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2021 17:09 IST2021-08-11T17:08:15+5:302021-08-11T17:09:37+5:30

एका लहान मुलाच्या आईनेही या जगातून जाण्याआधी आपल्या मुलासाठी लाखो रूपयांची संपत्ती जमा केली होती. पण एक दिवस ही संपत्ती मुलाच्या बापाच्या हाती लागली.

Father stole 39 lakh inheritance of his son and spent it on drugs and drink | आईने मुलासाठी जमवून ठेवली होती लाखोंची संपत्ती, बापाने चोरून ड्रग्स अन् दारूत उडवले सगळे पैसे

आईने मुलासाठी जमवून ठेवली होती लाखोंची संपत्ती, बापाने चोरून ड्रग्स अन् दारूत उडवले सगळे पैसे

आई-वडील मुलांचं भविष्य चांगलं बनवण्यासाठी पैसे जमा करतात आणि ते सांभाळून ठेवतात. जेणेकरून मुलांना त्यांचं भविष्य चांगलं करण्यासाठी फायदा होईल. एका लहान मुलाच्या आईनेही या जगातून जाण्याआधी आपल्या मुलासाठी लाखो रूपयांची संपत्ती जमा केली होती. पण एक दिवस ही संपत्ती मुलाच्या बापाच्या हाती लागली आणि त्याने अल्पवयीन मुलाच्या भविष्यासाठी ठेवलेले पैसे ऐश करण्यात खर्च केले.

ब्रिटनच्या साउथ वेल्समध्ये राहणारा डेनिअल कॉलफील्डने आपल्या अल्पवयीन मुलासोबत वाईट केलं. आपल्या सासूच्या मृत्यूनंतर त्याला जेव्हा मुलासाठी ठेवलेल्या £38,000 डॉलर म्हणजे ३९ लाख रूपयांबाबत समजलं तेव्हा त्याने तो सगळा पैसा ड्रग्स, दारू आणि फिरण्यात खर्च केला.  त्याला हे करत असताना एकदाही आपल्या मुलाच्या भविष्याचा विचार आला नाही.

अल्पवयीन मुलाच्या आईने ३८ वर्षांची असताना आपल्या मुलासाठी £38,000 इतकी रक्कम ठेवली होती. हा पैसा मुलाच्या आजीकडे ठेवला होता. ऑनलाइन साइट मिररनुसार, जेव्हा २०१५ मध्ये आजीचं निधन झालं तेव्हा या संपत्तीची माहिती मुलाच्या वडिलाला लागला. कार्पेट क्लिनिंगचं काम करणाऱ्या या व्यक्तीने मुलगा १८ वर्षाचा होईपर्यंत पैशांचा सांभाळ करायचा होता. पण त्याने जे केलं ते फारच वाईट आहे. 

कॉलफील्डने सगळा पैसा ड्रग्स आणि दारूत उडवला. मुलाला हे माहीत होतं की, आजीनंतर त्याचे वडील आणि आत्या या पैशांचे ट्रस्टी होते. अशात त्याने वयस्क झाल्यावर त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. तेव्हा त्याला समजलं की, वडिलांनी त्याचे सगळे पैसे खर्च केले.

जेव्हा हे प्रकरण कोर्टात गेलं तेव्हा यावर बोलताना जज  म्हणाले की, कॉलफील्डचा गुन्हा फार विचित्र आहे. आरोपीच्या वकिलांनी सांगितलं की, आता त्याला त्याच्या कृत्याचा पश्चाताप आहे. तो हे मान्य करतोय की त्याने त्याच्या मुलासोबत दगा केला. 

कॉलफील्डला ड्रग्सची सवय आहे. ज्यामुळे तो कधीही आर्थिक रूपाने मजबूत नव्हता. त्याने आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी किंवा भविष्यासाठी ठेवलेले पैसे दारूत आणि ड्रग्समध्ये उडवले. आत कॉलफील्ड म्हणतो की, तो त्याच्या मुलाला सगळा पैसा परत करेल. या गुन्ह्यासाठी त्याला २० महिन्यांची  तुरूंगवासाची शिक्षा आणि २ वर्ष सस्पेंशनची शिक्षा दिली आहे. त्याला २४० तास कोणत्याही वेतनाशिवाय काम करावं लागेल.
 

Web Title: Father stole 39 lakh inheritance of his son and spent it on drugs and drink

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.