शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

Farmers Protest : आंदोलनाला समर्थन देणाऱ्या कॅनडाच्या पंतप्रधानांकडून आता सरकारच्या प्रयत्नांचं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2021 8:46 PM

Farmers Protest: डिसेंबर महिन्यात जस्टिन ट्रुडो यांनी केलं होतं शेतकरी आंदोलनाचं समर्थन

ठळक मुद्देडिसेंबर महिन्यात जस्टिन ट्रुडो यांनी केलं होतं शेतकरी आंदोलनाचं समर्थनकोरोना प्रतिबंधात्मक लसीसाठी ट्रुडो यांनी पंतप्रधान मोदींकडे केली होती मागणी

गेल्या अनेक दिवसांपासून देशात नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. दरम्यान, या आंदोलनाला परदेशातील काही बड्या व्यक्तींनी समर्थन दिलं होतं. तसंच कॅनडाचेपंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनीदेखील या आंदोलनाला समर्थन दिलं होतं. परंतु आता कॅनडानं आपलं मत बदललं असून केंद्र सरकार करत असलेल्या प्रयत्नांचं कौतुक केलं आहे. शेतकरी आंदोलनाबाबती केंद्र सरकारनं चर्चेतून तोडगा काढण्याच्या घेतलेल्या निर्णयाचं ट्रुडो यांनी कौतुक केलं असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी दिली. तसंच कॅनडात असलेल्या भारतीय डिप्लोमॅट्स आणि परिसराची सुरक्षा अधिक चांगली ठेवणार असल्याचं आश्वासनही त्यांनी दिल्याचं श्रीवास्तव म्हणाले.यापूर्वी बुधवारी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारत सरकारला कोरोना प्रतिबंधात्मक लस पुरवण्याचं आवाहन केलं होतं. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील भारताकडून आवश्यक ती सर्वोतपरी मदत केली जाणार असल्याचं म्हटलं होतं. गेल्या काही महिन्यांपासून देशात कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आदोलन सुरू आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरूवातील कॅनडाच्या पंतप्रधानांनी या आंदोलनाला समर्थन दिलं होतं. त्यानंतर भारत आणि कॅनडामधील संबंध थोडे ताणले गेले होते. भारतानं यावर आक्षेप घेत कॅनडाच्या डिप्लोमॅट्सशी याबद्दल चर्चा केली होती. "कॅनडाच्या हाय कमिशनला समन्स बजावण्यात आलं आहे. तसंच जस्टिन ट्रुडो आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची आंदोलनाबद्दलची आंदोलनाबद्दलची टिपण्णी स्वीकार केली जाणार नाही. हे भारताच्या अंतर्गत प्रश्नांमध्ये दखल दिल्याप्रमाणे आहे," असं भारतानं स्पष्ट केलं होतं.  याव्यतिरिक्त भारतानं कॅनडाला इशारा देत दोन्ही देशांमधील संबंध यामुळे बिघडू शकतात असं म्हटलं होतं. गेल्या काही दिवसांपासून मात्र कॅनडाच्या मतामध्ये बदल झाल्याचं दिसून येत आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या मागणीनंतर भारतानंही कॅनडाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. दरम्यान, दोन्ही देशांमधील संबंध पुन्हा पूर्वपदावर येतील अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात येत आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानCanadaकॅनडाJustin Trudeauजस्टीन ट्रुडोCorona vaccineकोरोनाची लस