फेसबूक, व्हॉट्सअ‍ॅप वापरावर कर लावला; अख्खे शहर आगीत धुमसतेय

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 07:49 AM2019-10-22T07:49:15+5:302019-10-22T07:50:29+5:30

नागरिकांनी हा कर मागे घेण्याची मागणी सरकारकडे केली

Facebook, WhatsApp usage taxed in lebanon; The whole city is on fire | फेसबूक, व्हॉट्सअ‍ॅप वापरावर कर लावला; अख्खे शहर आगीत धुमसतेय

फेसबूक, व्हॉट्सअ‍ॅप वापरावर कर लावला; अख्खे शहर आगीत धुमसतेय

Next

बैरूत : स्मार्ट फोनचा वापर करून दिवसातील अनेक तास लोक सोशल मिडीयावर वावरताना दिसत आहेत. हा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अशा लोकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. लेबनॉनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकसारख्या सोशल मिडीयावर टॅक्स लावण्यात आल्याने शहारातील लोक हिंसक आंदोलन करत आहेत. या कारणामुळे गेल्या काही दिवसांपासून लेबनॉन आगीमध्ये धुमसत आहे. 


तेथील नागरिकांनी हा कर मागे घेण्याची मागणी सरकारकडे केली होती. यानंतर सरकारने हा कर मागे घेतला तरीही लोकांमधील राग शांत झालेला नसून जाळपोळ मोठ्या प्रमाणावर सुरूच आहे. यामुळे संयुक्त अरब अमिरातने (UAE) लेबनॉनमध्ये राहणाऱ्या त्यांच्या नागरिकांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. 


लेबनॉनच्या सरकारने गुरुवारी, 17 ऑक्टोबरला फेसबूक मॅसेंजर, व्हॉट्सअ‍ॅप सारख्या सोशल मिडीया अ‍ॅपवर टॅक्स आकारण्याची घोषणा केली होती. यानुसार सोशल मिडीया अ‍ॅपवरून कॉल करण्यावर कर लागू केला होता. सरकारने अ‍ॅप बेस्ड कॉलिंगवर प्रतिदिन 0.20 डॉलर म्हणजेच 14.16 रुपये कर लावला होता. सरकारच्या या घोषणेनंतर लोक काही वेळातच रस्त्यावर उतरले आणि आंदोलन करू लागले होते. आंदोलक आणि पोलिस यांच्यामध्ये हिंसक घटना सुरू झाल्या. यानंतर लेबनॉनने लगेचच हा निर्णय मागे घेतला. 


लेबनॉन सरकारने घेतलला कराचा निर्णय हा देशावरील आर्थिक संकटावर मात करण्यासाठी होता, मात्र तो नागरिकांना पटला नाही. रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांनी पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी सुरू केली. संतापलेल्या लोकांनी सर्व शहरातील वाहतूक कोडी केली. यामुळे सुरक्षा दलांसोबत आंदोलकांचा वाद झाला आणि हिंसक रूप प्राप्त झाले. यानंतर दुसऱ्याच दिवशी लेबनॉनचे पंतप्रधान साद अल-हीरो यांनी सांगितले होते की, देश कठीण काळातून जात आहे. अशात लोकांना संयम ठेवावा लागेल. 
 

Web Title: Facebook, WhatsApp usage taxed in lebanon; The whole city is on fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.