शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

ऑस्ट्रेलियातल्या 3 लाखांहून अधिक युजर्सचा डेटा लीक; फेसबुकविरोधात खटला दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2020 7:33 AM

फेसबुककडून ‘धीस इज युवर डिजिटल लाईफ ’ नामक अ‍ॅपला वापरकर्त्यांची माहिती देऊन वारंवार खासगी गोपनीयतेच्या कायद्याचा भंग केला जात आहे.

ठळक मुद्देवैयक्तिक डाटाचा गैरवापर केल्याच्या आरोपावरून ‘फेसबुक आयएनसी’विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या वैयक्तिक गोपनीयता नियामकांकडून खटला भरण्यात आला आहे. फेसबुककडून ‘धीस इज युवर डिजिटल लाईफ’ नामक अ‍ॅपला वापरकर्त्यांची माहिती देऊन वारंवार खासगी गोपनीयतेच्या कायद्याचा भंग केला जात आहे. फेसबुक आपल्या स्थापनेपासूनच खासगी गोपनीयतेच्या बाबतीत वादग्रस्त राहिले आहे. अलीकडे अमेरिका आणि युरोपीय देशांकडून त्याची वारंवार चौकशी होत आली आहे.

सिडनी : ३ लाख वापरकर्त्यांच्या वैयक्तिक डाटाचा गैरवापर केल्याच्या आरोपावरून ‘फेसबुक आयएनसी’विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या वैयक्तिक गोपनीयता नियामकांकडून खटला भरण्यात आला आहे. हा वैयक्तिक डाटा राजकीय प्रोफायलिंगसाठी वापरला जाण्याचीजोखीम असल्याचे सूत्रांनी सांगितले.ऑस्ट्रेलियाच्या माहिती आयुक्तांनी फेडरल कोर्टात याप्रकरणी तक्रार नोंदविली आहे. फेसबुककडून ‘धीस इज युवर डिजिटल लाईफ’ नामक अ‍ॅपला वापरकर्त्यांची माहिती देऊन वारंवार खासगी गोपनीयतेच्या कायद्याचा भंग केला जात आहे. ऑस्ट्रेलियातील ३,११,१२७ फेसबुक वापरकर्त्यांचा वैयक्तिक डाटा सल्लागार संस्था ‘केम्ब्रिज अ‍ॅनालिटिका’ला हस्तांतरित होण्याचा तसेच त्याचा राजकीय  प्रोफायलिंगसाठी वापर होण्याचा धोका आहे, असे आयुक्तांनी सोमवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. फेसबुक आपल्या स्थापनेपासूनच खासगी गोपनीयतेच्या बाबतीत वादग्रस्त राहिले आहे. अलीकडे अमेरिका आणि युरोपीय देशांकडून त्याची वारंवार चौकशी होत आली आहे. फेसबुकने केम्ब्रिज अ‍ॅनालिटिकाला वैयक्तिक डाटा विकल्याचे प्रकरण २०१८च्या सुरुवातीला समोर आले होते.याप्रकरणी फेसबुक विरोधात अमेरिकेत खटला दाखल झाला होता.हे प्रकरण फेसबुकने अमेरिकेच्या केंद्रीय व्यापार आयोगासोबत ५ अब्ज डॉलरचा करार करून जुलैमध्ये मिटवून घेतले होते. ऑस्ट्रेलियाच्या माहिती आयुक्त अँजेलिनी फॉक यांनी एका निवेदनात म्हटले की, ऑस्ट्रेलियात परिचालन करणाऱ्या सर्व संस्थांचा वैयक्तिक माहितीच्या बाबतीतील व्यवहार पारदर्शक आणि जबाबदार असला पाहिजे. फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर आपली वैयक्तिक माहिती आपल्याच नियंत्रणात ठेवण्यास वापरक र्ते असमर्थ आहेत, असे आमच्या निदर्शनास आले आहे. फसबुकने ई-मेलवरू न जारीके लेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, आयुक्तांनी केलेल्या चौकशीस फेसबुक मागील दोन वर्षांपासून संपूर्ण सहकार्य करीत आहे. आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवर महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. अ‍ॅप विकासकांना माहिती उपलब्ध होणार नाही, अशी व्यवस्था आम्ही निर्माण केली आहे. 

टॅग्स :Facebookफेसबुक