भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 20:53 IST2025-05-23T20:52:49+5:302025-05-23T20:53:36+5:30
'दहशतवादाविरुद्ध स्वतःचे रक्षण करण्याचा भारताला निश्चितच पूर्ण अधिकार आहे. '

भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
Pahalgam Terror Attack: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानावर कारवाई केली. या कारवाईला जगभरातील विविध देशांचा पाठिंबा मिळत आहे. आता याच क्रमाने जर्मनीनेभारताच्या कारवाईचे समर्थन केले आहे. जर्मन परराष्ट्र मंत्री जोहान वडेफुल यांनी या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आणि भारताला दहशतवादाविरुद्ध स्वसंरक्षण करण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे म्हटले.
'भारताने वॉटरबॉम्ब टाकला, आपण उपासमारीने मरू...', पाकिस्तानी खासदाराने व्यक्त केली भीती
जर्मनीचा भारताला पाठिंबा
वाडेफुल म्हणाले की, पहलगाम येथे झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याने आम्हाला धक्का बसला आहे. दहशतवादाविरुद्ध स्वतःचे रक्षण करण्याचा भारताला निश्चितच पूर्ण अधिकार आहे. पण, आता युद्धविराम लागू आहे, त्याचे आम्ही खूप कौतुक करतो. भारत आणि जर्मनीमध्ये दहशतवादविरोधी सहकार्यावर नियमित संवाद होत आहे आणि येणाऱ्या काळात तो आणखी मजबूत केला जाईल. यावेळी त्यांनी युद्धविराम कायम ठेवण्यावर आणि परस्पर संवादातून तोडगा काढण्यावर भर दिला.
Addressing the press alongside FM Johann Wadephul @AussenMinDE in Berlin.
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) May 23, 2025
🇮🇳 🇩🇪
https://t.co/osGzA4mo17
भारताने स्पष्ट केली आपली बाजू
भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर सध्या तीन देशांच्या दौऱ्यावर आहेत. बर्लिन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, दहशतवादाबाबत भारताचा दृष्टिकोन अगदी स्पष्ट आहे. भारत दहशतवाद अजिबात सहन करणार नाही. भारत कधीही अणुबॉम्बच्या धमकीला बळी पडणार नाही. भारत पाकिस्तानशी फक्त द्विपक्षीय मार्गानेच चर्चा करेल. कोणत्याही तिसऱ्या देशाची मध्यस्थी किंवा दबाव स्वीकारणार नाही.
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
जर्मनीचा पाठिंबा महत्त्वाचा
जयशंकर यांनी जर्मनीच्या पाठिंब्याचे स्वागत केले आणि म्हणाले की, जर्मनी भारताचा स्वसंरक्षणाचा अधिकार समजून घेतो याबद्दल आम्ही त्याचे कौतुक करतो. प्रत्येक देशाला दहशतवादाविरुद्ध स्वतःचे रक्षण करण्याचा अधिकार आहे.