चीनकडून रोज मिळणाऱ्या धमक्यांना कंटाळून तैवानने आता युद्ध पुकारण्याची तयारी सुरू केली आहे. शक्तीत चीनपेक्षा कमकुवत असूनही तैवानचे इरादे मात्र बुलंद आहेत. त्यांनी आपल्या आरक्षित सैनिकांना (Reserve Soldiers) म्हणजेच सामान्य नागरिकांना लष्करी प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. या नागरिकांना शस्त्रे एकत्र करणे, ती चालवणे, अचूक निशाणा साधणे आणि युद्धादरम्यान लपून-छपून शत्रूंवर हल्ला करण्याची ट्रेनिंग दिली जात आहे.
तैवानच्या मियाओली काउंटीतील जुशिंग प्रायमरी स्कूलमध्ये हे प्रशिक्षण सुरू झाले आहे. इथे लहान मुलांसोबतच पूर्ण लष्करी गणवेशात आरक्षित सैनिक चिनी हल्लेखोरांचा सामना कसा करायचा हे शिकत आहेत. तैवानच्या वार्षिक 'हान कुआंग' (Han Kuang) लष्करी सरावाचा हा भाग मानला जात आहे, ज्यात यावेळी २२ हजारांहून अधिक आरक्षित सैनिक सहभागी होण्याची अपेक्षा आहे. चीनने हल्ला केल्यास तैवान कसा प्रत्युत्तर देईल, यावर या सरावाचे लक्ष केंद्रित केले आहे.
रायफल्स आणि मशीन गनने ट्रेनिंगराजधानी तैपेईपासून ६० मैल दक्षिणेस असलेल्या मियाओली येथील एका प्राथमिक शाळेत ७० आरक्षित सैनिकांना '६५के२' रायफल्स, 'एम२४९' स्क्वॉड मशीन गन (Squad Machine Guns) आणि 'टी ७४' प्लाटून मशीन गन (Platoon Machine Guns) यांच्यासह प्रशिक्षण दिले जात आहे. द टेलिग्राफने प्रशिक्षण देणाऱ्या ३०२ व्या इन्फंट्री ब्रिगेडचे (302nd Infantry Brigade) चीफ ऑफ स्टाफ कर्नल चेंग त्झु-चेंग यांच्या हवाल्याने लिहिले आहे की, प्रशिक्षणाचा उद्देश आरक्षित सैनिकांमध्ये शस्त्रे चालवण्याची क्षमता टिकवून ठेवणे हा आहे, जेणेकरून युद्धाच्या परिस्थितीत ते लवकरात लवकर तयार होऊ शकतील.
शाळेची इमारत लष्कराच्या ताब्यात!३०२ व्या इन्फंट्री ब्रिगेडने शाळेची संपूर्ण इमारत ताब्यात घेतली आहे. इमारतीच्या तळमजल्यावर सामान्य पद्धतीने मुलांचे शिक्षण सुरू आहे, पण वरच्या मजल्यावर आरक्षित सैनिक वारंवार मशीन गन उघडण्याचा आणि जोडण्याचा सराव करत आहेत. इथेच जिममध्ये अचूक निशाणा साधण्याचे प्रशिक्षण दिले जाते, लाकडी मोठ्या कटआउट्सच्या मागे लपून भिंतीवर तात्पुरत्या लक्ष्यांवर निशाणा साधला जातो. यातील बहुतेक सामान्य नागरिक आहेत.
तैवानपेक्षा चीनची ताकद सहापट जास्त!तैवानची लोकसंख्या २.३ कोटी आहे, यात १ लाख ८० हजार सक्रिय सैनिक आणि १६.७ लाख आरक्षित सैनिक आहेत. याउलट, १.४ अब्ज लोकसंख्या असलेल्या चीनमध्ये २० लाखांहून अधिक सक्रिय सैनिक आणि १२ लाख आरक्षित सैनिक आहेत. इतर बाबतीत चीन तैवानपेक्षा कमीतकमी सहापट पुढे आहे. तैवानच्या सैन्याच्या तुलनेत चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी (PLA) अधिक धोकादायक मानली जाते. याशिवाय चीनकडे तैवानच्या तुलनेत सहापट जास्त रणगाडे, तोफखाना आणि फायटर जेट्स आहेत.
'ग्रे झोन'मध्ये सामना करायला शिकवणारकर्नल चेंग यांनी सांगितले की, प्रशिक्षणादरम्यान आरक्षित सैनिकांना 'ग्रे झोन'मध्ये (Grey Zone) लढायला शिकवले जाईल. यात सायबर हल्ले, तैवानच्या हवाई क्षेत्रात चीनची घुसखोरी, समुद्राखालील केबल्सना होणारे नुकसान इत्यादींचा समावेश आहे. पुढील दहा दिवसांत तैवानच्या लष्करातील मोठ्या शस्त्रांविषयी त्यांना माहिती दिली जाईल, ज्यात अमेरिकेकडून पुरवलेली मोबिलिटी आर्टिलरी रॉकेट सिस्टिम्स (HIMARS), 'टीओडब्लू २बी' अँटी टँक मिसाईल (Anti Tank Missile), नवीन मानवरहित विमान वाहने (UAV) आणि स्काय स्वोर्ड २ (Sky Sword II) क्षेपणास्त्राची घरगुती बनावटीची आवृत्ती यांचा समावेश आहे.