एपस्टीन फाइल : महिलेने केलेल्या आरोपांची कागदपत्रे लपवली! अमेरिकेच्या न्याय विभागावर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 11:09 IST2026-02-27T11:08:18+5:302026-02-27T11:09:29+5:30

एका अज्ञात महिलेने ट्रम्प यांच्यावर केलेल्या आरोपांच्या मुलाखतींचे गोषवारे यातून गायब आहेत. एपस्टीन आणि ट्रम्प या दोघांनी आपले लैंगिक शोषण केले होते, असे आरोप त्या महिलेने केले होते.

Epstein file: Documents of allegations made by woman were hidden! | एपस्टीन फाइल : महिलेने केलेल्या आरोपांची कागदपत्रे लपवली! अमेरिकेच्या न्याय विभागावर आरोप

एपस्टीन फाइल : महिलेने केलेल्या आरोपांची कागदपत्रे लपवली! अमेरिकेच्या न्याय विभागावर आरोप

वॉशिंग्टन : जेफ्री एपस्टीन प्रकरणाशी संबंधित काही महत्त्वपूर्ण कागदपत्रे सार्वजनिक करताना ती दडपल्याचा आरोप अमेरिकेच्या न्याय विभागावर होत आहे. यामध्ये प्रामुख्याने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर एका महिलेने केलेल्या आरोपांच्या कागदपत्रांचा समावेश असून या प्रकरणाची आता चौकशी सुरू करण्यात आली आहे.

गेल्या महिन्यात न्याय विभागाने एपस्टीनशी संबंधित ३० लाख कागदपत्रे प्रसिद्ध केली. मात्र, अनेक वृत्तसंस्थांनी असा दावा केला की, एका अज्ञात महिलेने ट्रम्प यांच्यावर केलेल्या आरोपांच्या मुलाखतींचे गोषवारे यातून गायब आहेत. १९८० च्या दशकात अल्पवयीन असताना एपस्टीन आणि ट्रम्प या दोघांनी आपले लैंगिक शोषण केले होते, असे आरोप त्या महिलेने केले होते.

'इकॉनॉमिक फोरम'चे अध्यक्ष बोर्ग ब्रेंडे यांनी दिला राजीनामा

जिनिव्हा : वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे (डब्ल्यूईएफ) अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी बोर्ग ब्रेंडे यांनी गुरुवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीनसोबतच्या त्यांच्या कथित संबंधांची स्वतंत्र चौकशी सुरू झाल्यानंतर अवघ्या काही आठवड्यांतच त्यांनी हा निर्णय घेतला.

ब्रेडे यांनी एपस्टीनसोबत तीन व्यावसायिक मेजवान्यांना हजेरी लावली होती. त्यांच्यात ई-मेल आणि संदेशांद्वारे संवाद झाल्याचेही समोर आले आहे.

 

Web Title : एपस्टीन फ़ाइलें: कवर-अप का आरोप; ट्रम्प पर आरोप छिपे, जांच के आदेश

Web Summary : अमेरिकी न्याय विभाग पर जेफरी एपस्टीन से संबंधित दस्तावेजों को दबाने का आरोप है, विशेष रूप से डोनाल्ड ट्रम्प के खिलाफ एक महिला के आरोपों वाले दस्तावेज़। महिला ने दावा किया कि एपस्टीन और ट्रम्प दोनों ने 1980 के दशक में उसका यौन शोषण किया। जांच चल रही है। एपस्टीन से संबंधों के बीच वर्ल्ड इकोनॉमिक फोरम के अध्यक्ष बोर्ग ब्रेंडे ने इस्तीफा दे दिया।

Web Title : Epstein Files: Cover-up Alleged; Trump Accusations Hidden, Inquiry Ordered

Web Summary : US Justice Department faces scrutiny for allegedly suppressing documents related to Jeffrey Epstein, specifically those containing a woman's accusations against Donald Trump. The woman claimed both Epstein and Trump sexually abused her in the 1980s. An investigation is underway. World Economic Forum chairman Borg Brende resigned amid Epstein links.