शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

"जर तुम्ही लोकशाहीचा सन्मान करू शकत नसाल तर..."; ग्रेटा थनबर्गनंचं पुन्हा एक ट्वीट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2021 19:17 IST

यापूर्वीही ग्रेटानं कृषी आंदोलनाच्या समर्थनार्थ केलं होतं ट्वीट

ठळक मुद्देयापूर्वीही ग्रेटानं कृषी आंदोलनाच्या समर्थनार्थ केलं होतं ट्वीटअभिनेते प्रकाश राज यांनी ग्रेटाचं ट्वीट केलं लाईक

हवामान बदलासारख्या विषयांवर काम करणारी ग्रेटा थनबर्ग ही सोशल मीडियावर खुप सक्रिय आहे. काही दिवसांपूर्वी भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला ट्वीट करत तिनं समर्थन दिलं होतं. तिच्या ट्वीटनं अनेकांचं लक्ष वेधलं होतं. सोशल मीडियावर काही जणांनी तिच्या ट्वीटचा विरोध केला तर काहींनी तिच्या ट्वीटचं समर्थन केल्याचं पाहायला मिळालं होतं. तिच्या ट्वीटवरून वाद सुरू असतानाच तिनं पुन्हा एकदा एक ट्वीट केलं आहे. यामध्ये तिनं विज्ञान आणि लोकशाही एकमेकांशी जोडलं गेल्याचं म्हटलं. "विज्ञान आणि लोकशाही एकमेकांशी जोडलेले आहेत. कारण हे दोन्ही बोलण्याचं स्वातंत्र्य, स्वातंत्र्य, तथ्य आणि परदर्शकतेवर आधारित आहे. जर तुम्ही विज्ञानाचा आदर केला नाही तर तुम्ही लोकशाहीचाही आदर करू शकणार नाही. तसंच जर तुम्ही विज्ञानाचा आदर केला नाही तर तुम्ही लोकशाहीचा आदर करू शकणार नाही," असं ट्वीट ग्रेटा थनबर्गनं केलं आहे. यापूर्वी अभिनेते प्रकाश राज यांनी ग्रेटा थनबर्गच्या ट्वीटचं समर्थन केलं होतं. आता त्यांनी तिचं हे नवं ट्वीट लाईकदेखील केलं आहे. अमित शाहंनही दुष्प्रचार म्हणत केला होता विरोध"कोणताही दुष्प्रचार देशाचं ऐक्य तोडू शकत नाही. कोणताही दुष्प्रचार भारताला विकासाची उची गाठण्यापासून रोखू शकत नाही, दुष्प्रचार हा भारताचं भवितव्य ठरवू शकत नाही केवळ विकास ते ठरवू शकतो. भारत एकसंध आहे आणि एकसंध राहूनच विकासकडे वाटचाल करेल," असं ट्वीट अमित शाह यांनी केलं होतं. यापूर्वी पॉप सिंगर रिहाना आणि ग्रेटा थनबर्ग यांनी भारतात सुरू असलेल्या कृषी आंदोलनावर वक्तव्य केलं होतं. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाकडून त्यावर उत्तरही देण्यात आलं होतं.  

कोणत्याही प्रकारचा दुष्प्रचार देशाचे ऐक्य तोडू शकत नाही : अमित शाह

ग्रेटा थनबर्गनेकडून समर्थनरिहानानंतर आता स्विड‍िश पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिनंही शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्वीट केलं आहे. आम्ही भारतातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पाठीशी एकजुटीने उभे आहोत, असं तिनं म्हटलं होतं.

रिहानंनंही केलं ट्वीटदिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांचा आवाज आता जगभर पसरत आहे. याच शेतकऱ्यांचा आवाज आता प्रसिद्ध पॉप सिंगर आणि परफॉर्मर रिहानापर्यंतही पोहोचला आहे. रिहानानं शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्वीट केलं. रिहानाने ट्विटरवर एक न्यूज शेअर केली आहे. यात शेतकरी आंदोलनामुळे बंद केलेल्या इंटरनेट सुविधेचाही उल्लेख आहे. यात, शेतकरी आंदोलनामुळे हरियाणातील अनेक जिल्ह्यांत कशा प्रकारे इंटरनेट सेवा बंद करण्यात आली, हेही सांगितलं आहे. रिहानाने या बातमीसोबत बरोबर कॅप्शनमध्ये लिहिले आहे, यासंदर्भात आपण चर्चा का करत नाही? #FarmersProtest. रिहानाच्या ट्विटनंतर शेतकरी आंदोलनाची जगभर चर्चा होत असल्याचं दिसून येत आहे. 

टॅग्स :IndiaभारतFarmers Protestशेतकरी आंदोलनRihannaरिहानाdelhiदिल्लीAmit Shahअमित शहाTwitterट्विटर