सोशल मीडियावर रॅम्बोच्या मृत्यूच्या अफवेने उडाली खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2018 16:44 IST2018-02-20T16:36:14+5:302018-02-20T16:44:56+5:30

हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आणि निर्माता सिल्वेस्टर स्टेलॉनने त्याच्या संदर्भात सोशल मीडियावर फिरणारे चुकीचे संदेश आणि बातम्यांकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन केले आहे.

Embarrassment by the rumors of the death of the ramboo on social media | सोशल मीडियावर रॅम्बोच्या मृत्यूच्या अफवेने उडाली खळबळ

सोशल मीडियावर रॅम्बोच्या मृत्यूच्या अफवेने उडाली खळबळ

ठळक मुद्देमाझी तब्येत ठणठणीत असून मी तंदुरुस्त आणि आनंदी आहे. रॉकी, रॅम्बो हे सिल्वेस्टरचा गाजलेले चित्रपट आहेत.

न्यूयॉर्क - हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आणि निर्माता सिल्वेस्टर स्टेलॉनने त्याच्या संदर्भात सोशल मीडियावर फिरणारे चुकीचे संदेश आणि बातम्यांकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन केले आहे. सोशल मीडियावर सिल्वेस्टर स्टेलॉनचे निधन झाल्याची अफवा पसरली असून तसे मेसेज व्हायरल झाले आहेत. सिल्वेस्टरने आपल्या चाहत्यांना अशा मेसेजेसकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन केले आहे. त्या मुर्खपणाकडे दुर्लक्ष करा असे टि्वट स्टेलॉनने केले आहे. 

माझी तब्येत ठणठणीत असून मी तंदुरुस्त आणि आनंदी आहे. अजूनही ठोसे लगावत आहे असे सिल्वेस्टरने म्हटले आहे.  सोशल मीडियावर फिरणाऱ्या फोटोंमध्ये सिल्वेस्टर खंगलेला दिसत असून त्याच्या डोक्यावरचे केस गळलेले आहेत. 

सिल्वेस्टरच्या एखाद्या चित्रपटातील तो सीन असण्याची शक्यता आहे. रॉकी, रॅम्बो हे सिल्वेस्टरचा गाजलेले चित्रपट आहेत. रॅम्बो मालिकेतील चारही चित्रपटात सिल्वेस्टरची मुख्य भूमिका होती. 80-90 च्या दशकात सिल्वेस्टरच्या बलदंड शरीरयष्टीने तरुणाईला भुरळ घातली होती.                

                      


 

Web Title: Embarrassment by the rumors of the death of the ramboo on social media