Elon Musks new girlfriend: 'ही' आहे इलॉन मस्क यांची नवी गर्लफ्रेंड; जाणून घ्या, या 23 वर्षांनी छोट्या मिस्ट्री गर्लबद्दल खास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 23:54 IST2022-05-31T23:53:13+5:302022-05-31T23:54:14+5:30

Elon Musks new girlfriend: इलॉन मस्क हे पहिल्यांदाच एखाद्या रिलेशनशिपमध्ये आले, असे नाही. यापूर्वी त्यांनी 3 वेळा लग्न केले आहे. या पूर्वीच्या तीन पत्नींपासून त्यांना एकूण 6 मुले आहेत.

Elon Musks new girlfriend know about the secret of 23 years younger mystery girl | Elon Musks new girlfriend: 'ही' आहे इलॉन मस्क यांची नवी गर्लफ्रेंड; जाणून घ्या, या 23 वर्षांनी छोट्या मिस्ट्री गर्लबद्दल खास

Elon Musks new girlfriend: 'ही' आहे इलॉन मस्क यांची नवी गर्लफ्रेंड; जाणून घ्या, या 23 वर्षांनी छोट्या मिस्ट्री गर्लबद्दल खास

टेस्‍ला आणि स्‍पेसएक्‍स कंपन्यांचे मालक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी इलॉन त्याच्या बिझनेस डीलमुळे नाही तर रिलेशनशिपमुळे चर्चेत आले आहेत. इलॉन मस्क यांचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये ते त्यांच्या 23 वर्षांनी छोट्या असलेल्या गर्लफ्रेंडसोबत क्वालिटी टाइम स्पेंड करताना दिसत आहेत. तर जाणून घेऊयात कोण आहे, इलॉन मस्क यांची ही नवी गर्लफ्रेंड... (Elon Musk New Girlfriend Natasha Bassett)

अॅक्ट्रेस आहे इलॉन यांची नवी गर्लफ्रेंड - 
इलॉन मस्क यांच्या या नव्या गर्लफ्रेंडचे नाव नताशा बॅसेट (Natasha Bassett) असे आहे. ती एक अभिनेत्री असून मस्क यांच्या पेक्षा तब्बल 23 वर्षांनी छोटी आहे. साधारणपणे 50 वसंत ऋतू पाहिलेल्या मस्‍क यांची गर्लफ्रेंड नताशा ही 27 वर्षांची आहे.

कुठे दिसून आले इलॉन-नताशा -
मस्क आणि नताशा हे चेवल ब्लँक हॉटेलमध्ये डिनर करताना दिसून आले. अब्जाधीशांचा स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सेंट ट्रोपेझमध्ये हे जोडपे डेटिंग करताना दिसले आहे. या हॉटेलमध्ये एक रात्र घालविण्यासाठी जवळपास 1300 डॉलर एवढा खर्च येतो.

या चित्रपटात दिसणार नताशा -
इलॉन मस्क हे पहिल्यांदाच एखाद्या रिलेशनशिपमध्ये आले, असे नाही. यापूर्वी त्यांनी 3 वेळा लग्न केले आहे. या पूर्वीच्या तीन पत्नींपासून त्यांना एकूण 6 मुले आहेत. इलॉन मस्क हे करियरसाठीही आपली गर्लफ्रेंड नताशाला मदत करतात. नताशा लवकरच 'एल्विस' या बायोपिकमध्ये अमेरिकन गायकाच्या पहिल्या गर्लफ्रेंडच्या भूमिकेत दिसणार आहे.

Web Title: Elon Musks new girlfriend know about the secret of 23 years younger mystery girl