'एपस्टीन'च्या 'Wild' पार्टीत एलॉन मस्क, मार्क झुकरबर्ग उपस्थित होते, फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 15:37 IST2026-02-10T15:11:48+5:302026-02-10T15:37:22+5:30

जेफ्री एपस्टीनच्या जुन्या ईमेल आणि फोटो उघड केल्याने जगभरातील अनेक मोठे चेहरे उघड होत आहेत. तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गत असलेले इलॉन मस्क आणि फेसबुकचे मार्क झुकेरबर्ग यांच्या नावाचाही समावेश आहे. जेफ्री एपस्टीनच्या फायलींमधून असंख्य नावे समोर आली आहेत.

Elon Musk, Mark Zuckerberg attended Epstein's 'Wild' party, photos surface | 'एपस्टीन'च्या 'Wild' पार्टीत एलॉन मस्क, मार्क झुकरबर्ग उपस्थित होते, फोटो आले समोर

'एपस्टीन'च्या 'Wild' पार्टीत एलॉन मस्क, मार्क झुकरबर्ग उपस्थित होते, फोटो आले समोर

जेफ्री एपस्टीन प्रकरणात दररोज नवीन खुलासे समोर येत आहेत. जेफ्री एपस्टीन याने आयोजित केलेल्या एका भव्य डिनर पार्टीमध्ये एलॉन मस्क आणि मार्क झुकरबर्ग यांचा एक नवीन फोटो समोर आला आहे. हा फोटो जेफ्री एपस्टीन याला लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आले होते त्या काळात काढण्यात आला होता. यामुळे आता या पार्टीला एलॉन मस्क आणि मार्क झुकेरबर्गही उपस्थित होते का ? या चर्चा सुरू आहेत.

ओम बिर्ला यांच्याविरुद्धचा अविश्वास प्रस्ताव लोकसभा सचिवालयात सादर, ११८ खासदारांच्या स्वाक्षऱ्या

लिंक्डइनचे सह-संस्थापक रीड हॉफमन आणि पेपलचे सह-संस्थापक पीटर थिएल यांनीही पार्टीला हजेरी लावली होती, असा दावा एपस्टीनने केला. दुसऱ्या ईमेलमध्ये पार्टीला "Wild" असे वर्णन केले आहे. मस्क आणि झुकरबर्ग एका टेबलावर एकत्र बसलेले दिसत असलेला एक फोटो समोर आला आहे. टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ एलॉन मस्क कॅमेऱ्याकडे पाहत आहेत, जो कदाचित एपस्टीनने काढला फोटो असेल. फोटोमध्ये झुकरबर्ग देखील आहे, ते थोडे गंभीर दिसत आहेत.

एलॉन मस्क यांनी काय दावा केला?

जेफ्रीने हा फोटो स्वतःला ३ ऑगस्ट २०१५ रोजी पाठवला. मी कधीही जेफ्री एपस्टीनच्या पार्ट्यांमध्ये गेलो नव्हतो, असा दावा मस्क यांनी केला होता. पण आता फोटोने खळबळ उडाली. शिवाय, मस्क यांनी जेफ्रीसोबत गुन्हे करणाऱ्यांवर खटला चालवण्याची मागणीही केली.

मस्क यांनी ३१ जानेवारी रोजी याबद्दल ट्विट केले. एपस्टीनच्या पार्ट्यांमध्ये फक्त एलॉन मस्क आणि मार्क झुकरबर्गच नव्हे तर इतर अनेक प्रमुख व्यक्तीही वारंवार येत होत्या. मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स देखील वारंवार उपस्थित होते.

Web Title : एपस्टीन की 'वाइल्ड' पार्टी में मस्क, ज़ुकरबर्ग? तस्वीर सामने आई, विवाद

Web Summary : जेफ्री एपस्टीन द्वारा आयोजित एक पार्टी में एलन मस्क और मार्क जुकरबर्ग की एक तस्वीर सामने आई है, जिस पर यौन शोषण का आरोप था। "वाइल्ड" के रूप में वर्णित इस सभा में अन्य प्रमुख व्यक्ति भी शामिल थे। मस्क ने एपस्टीन की पार्टियों में भाग लेने से इनकार किया, लेकिन तस्वीर सवाल उठाती है।

Web Title : Musk, Zuckerberg at Epstein's 'Wild' Party? Photo Surfaces, Sparks Controversy

Web Summary : A photo surfaced showing Elon Musk and Mark Zuckerberg at a party allegedly hosted by Jeffrey Epstein, who was convicted of sexual abuse. The gathering, described as "Wild," included other prominent figures. Musk denies attending Epstein's parties, but the photo raises questions.