Elon Musk Twins: बिंग फुटले! एलन मस्क यांना सात नाही, नऊ मुले; टॉप एक्झिक्युटीव्हपासून जुळे जन्मले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2022 15:02 IST2022-07-07T15:02:07+5:302022-07-07T15:02:56+5:30

एलन मस्क यांना एक ट्रान्सजेंडर मुलगी देखील आहे. तिने तिचे नाव बदलण्यासाठी याचिका दाखल केली होती.

elon Musk has nine children; top executive SHIVON ZILIS gave birth to Twins: Report | Elon Musk Twins: बिंग फुटले! एलन मस्क यांना सात नाही, नऊ मुले; टॉप एक्झिक्युटीव्हपासून जुळे जन्मले

Elon Musk Twins: बिंग फुटले! एलन मस्क यांना सात नाही, नऊ मुले; टॉप एक्झिक्युटीव्हपासून जुळे जन्मले

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांच्याबाबत आणखी एक मोठा खुलासा झाला आहे. पत्नीशी घटस्फोट, गर्लफ्रेंडसोबत लिव्ह इन यानंतर आता एलन मस्कपासून त्यांच्याच कंपनीच्या एका टॉप एक्झिक्युटीव्हला जुळी मुले झाली आहेत. यामुळे पुन्हा एकदा मस्क चर्चेत आले आहेत. 

यामुळे या अब्जाधीशाला सात नाही तर आता नऊ मुले आहेत. बिझनेस इनसायडरच्या रिपोर्टनुसार नोव्हेंबर २०२१ मध्ये मस्क यांच्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या शिवोन जिलिस हिने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. शिवोन ही एलन मस्क यांच्या न्यूरालिंकमध्ये अधिकारी पदावर आहे. 

या दोन जुळ्या मुलांचा खुलासा तेव्हा झाला, जेव्हा दोघांनी मिळून कोर्टात या मुलांच्या नावाच्या शेवटी पित्याचे आणि मध्ये आईचे नाव जोडण्यात यावे म्हणून याचिका दाखल केली आहे. यामुळे मस्क यांच्या या मुलांबाबत जगाला समजले आहे. मे महिन्यात मस्क आणि शिवोन यांच्या याचिकेवर निर्णय झाला. मुलांना त्यांच्या म्हणण्याप्रमाणे नावे देण्यात आली आहेत. 
शिवोन जिलिस सोबत संबंधांनंतर दोन मुले झाल्याची माहिती सार्वजनिक झाल्यावर आता मस्क यांची ९ मुले असल्याचे मानले जात आहे. मस्क यांची माजी पत्नी कॅनेडिअन लेखिका जस्टिन विल्सनपासून त्यांना ५ मुले आहेत. तर गर्लफ्रेंड कॅनेडिअन सिंगर ग्राईम्सपासून त्यांना दोन मुले आहेत. 

एलन मस्क यांना एक ट्रान्सजेंडर मुलगी देखील आहे. तिने तिचे नाव बदलण्यासाठी याचिका दाखल केली होती. तिला तिच्या वडिलांशी कोणत्याही प्रकारे नाते नको होते. तिचे नाव झेवियर अलेक्झांडर मस्क होते. तिला १८ वर्षे पूर्ण झाल्यावर विवियन जेना विल्सन हे नाव ठेवण्याची परवानगी देण्यात आली. 
 

Web Title: elon Musk has nine children; top executive SHIVON ZILIS gave birth to Twins: Report