शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

एलॉन मस्क-डोनाल्ड ट्रम्प यांचे ब्रेकअप; धमक्या अन् ‘यू टर्न’ सुरू, अमेरिकेचे राजकारण रंगात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 13:20 IST

ड्रॅगन कॅप्सूलची सेवा बंद करण्याची दिली होती धमकी

वॉशिंग्टन: टेस्ला व स्पेसएक्सचे सर्वेसर्वा इलॉन मस्क यांच्या कंपन्यांशी असलेल्या करारांत कपात करण्याची घोषणा अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. यावर अंतराळवीरांची, तसेच इतर साहित्याची आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर ने-आण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘ड्रॅगन कॅप्सूल’ची सेवाच बंद करण्याची धमकी मस्क यांनी सोशल मीडियावर दिली. परंतु यावर यूजर्सच्या प्रतिक्रियांचा पाऊस सुरू झाला. एका यूजरने ‘हे अत्यंत लज्जास्पद’ असल्याची पोस्ट केली. याला उत्तर देताना मस्क यांनी ‘यू-टर्न’ घेत आपण हा निर्णय मागे घेत असल्याचे जाहीर केले.

नासा’चा कणा

अमेरिकी सरकारच्या बोईंग कंपनीचे स्टारलायनर यान अपयशी ठरल्यानंतर भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्सला ड्रॅगन कॅप्सूलनेच पृथ्वीवर सुरक्षित परत आणले होते. ‘नासा’च्या अवकाश मोहिमांत मस्क यांची ड्रॅगन कॅप्सूल म्हणजे एक कणा ठरली होती. शिवाय ‘नासा’ने अनेक लष्करी मोहिमांतही स्पेसएक्सची मदत घेतली आहे.

ड्रॅगन कॅप्सूलचे महत्त्व

अंतराळ स्थानकावरून साहित्य-अंतराळवीरांची ने-आण करण्यात सक्षम असलेली स्पेसएक्स ही एकमेव अमेरिकी कंपनी आहे.अवकाश स्थानकावरील प्रयोग व अभ्यास सुरळीत चालावा यासाठी अमेरिकी अवकाश संस्था ‘नासा’ बहुतांशपणे स्पेसएक्सवर विसंबून आहे.

सेक्स स्कँडलमध्ये ट्रम्प?

मस्क यांनी एक खळबळजनक दावा केला की डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव जेफ्री एपस्टीनच्या फायलींमध्ये आहे. मस्क यांनी म्हटले की, आता मोठा खुलासा करण्याची वेळ आली आहे. ट्रम्प यांचे नाव एपस्टीन सेक्स स्कँडल फायलींमध्ये आहे. त्यामुळेच या फाईल सार्वजनिक करण्यात आल्या नाहीत. ट्रम्प, तुमचा दिवस चांगला जावो. त्यांनी पुढे म्हटले आहे, भविष्यासाठी ही पोस्ट लक्षात ठेवा. सत्य बाहेर येईल.

हा झाला असता परिणाम

  • अंतराळवीर, साहित्याची ने-आण खोळंबली असती
  • नासासाठी रशियाचे यान हाच होता एकमेव पर्याय

काय होता वाद?

ट्रम्प यांनी स्पेसएक्स आणि इंटरनेट उपग्रह सेवा देणाऱ्या स्टारलिंक या इलॉन मस्क यांच्या कंपन्यांच्या अब्जावधी डॉलरच्या करारांत कपात करण्याची धमकी दिली होती. यामुळे मस्क यांनी ड्रॅगन कॅप्सूलची सेवा हळूहळू बंद करण्याचा इशारा दिला होता.

...तर रशियावर होती भिस्त

स्पेसएक्सने अंग काढून घेतले तर ‘नासा’ला मोहिमांसाठी रशियाची सोयूझ कॅप्सूल हाच एकमेव पर्याय होता. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पelon muskएलन रीव्ह मस्कNASAनासा