बायडेन यांचा गैरसमज आहे, की त्यांना देशात परिवर्तनासाठी निवडण्यात आले; पण..., Musk यांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 12:26 PM2022-05-13T12:26:31+5:302022-05-13T12:31:24+5:30

बायडेन यांचा गैरसमज आहे, की त्यांना देशात परिवर्तन घडविण्यासाठी निवडण्यात आले, पण

elon musk commented on us president joe biden says its his mistake to think he was chosen for reforms | बायडेन यांचा गैरसमज आहे, की त्यांना देशात परिवर्तनासाठी निवडण्यात आले; पण..., Musk यांचा टोला

बायडेन यांचा गैरसमज आहे, की त्यांना देशात परिवर्तनासाठी निवडण्यात आले; पण..., Musk यांचा टोला

googlenewsNext

टेस्लाचे सीईओ (Tesla CEO) इलॉन मस्क (Elon Musk) यांनी अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडेन (US President Joe Biden) यांच्याव थेट निशाणा साधला आहे. "सर्वांना कमी नाटक हवे होते, म्हणून बायडेन यांची अमेरिकेचे राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आली. मात्र, त्यांना देशात सुदारणा करण्यासाठी निवडण्यात आले, असा त्यांचा गैरसमज आहे," असे इलॉन मस्क यांनी म्हटले आहे.  

"बायडेन यांचा गैरसमज आहे, की त्यांना देशात परिवर्तन घडविण्यासाठी निवडण्यात आले आहे. पण, सर्वांनाच कमी ड्रामा हवा होता, म्हणून त्यांना निवडण्यात आले," असे ट्विट इलॉन मस्क यांनी केले आहे. इलॉन मस्क हे लवकरच 44 बिलियन डॉलरमध्ये ट्विटर टेकओव्हर करत आहेत. एवढेच नाही, तर ट्विटरकडून माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर लादण्यात आलेली बंदीही आपण उठवणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.  

2024 साठी कमी ध्रुविकरण करणारा उमेदवारच ठीक असेल, असे ट्विटही इलॉन मस्क यांनी केले आहे. ट्रम्प यांनी पुन्हा एकदा ट्विटरवर यावे, असेही त्यांना वाटते. डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाउंट गेल्यावर्षी सस्पेंड करण्यात आले होते. 

Web Title: elon musk commented on us president joe biden says its his mistake to think he was chosen for reforms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.