शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
3
आजचे राशीभविष्य - ०९ मे २०२४ : आर्थिक फायदा संभवतो,विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील
4
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
5
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
6
...म्हणून दक्षिण मुंबईची जागा लढवली नाही; मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा खुलासा
7
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्युत्तर...
8
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
9
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
10
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
11
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
12
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
13
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
14
पूर्वेकडचे लोक चिनी, दक्षिणेतील आफ्रिकींसारखे; सॅम पित्रोदा यांचे वादग्रस्त उद्गार; काँग्रेसने घेतला राजीनामा
15
राज्यात लोकसभेनंतर रंगणार शिक्षक, पदवीधर निवडणूक; १० जूनला मतदान, १३ जूनला निकाल
16
महादेव ॲपशी निगडित १ हजार कोटी शेअर्समध्ये? बनावट कंपन्यांद्वारे गुंतवणुकीचा संशय
17
महिनाभरात २२ लाख वाहनांची विक्री; २७ टक्के वाढ;  देशभरातील खरेदीदारांमध्ये प्रचंड उत्साह
18
टेनिस बॉल क्रिकेटमधून शिकलो ‘सुपला शॉट’; सूर्यकुमार यादवने सांगितली आठवण; आपसूक मारला जातो हा फटका
19
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
20
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर

Elon Musk: तिसऱ्या अब्जाधीशाचाही संसार 'मोडला'; गर्लफ्रेंडपासून वेगळे झाले एलन मस्क

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2021 1:33 PM

Elon Musk and Grimes break up: मस्क यांनी त्यांच्या मुलाचे नाव X Æ A-Xii असे विचित्र ठेवले आहे. मस्क यांनी एका कामासाठी आपली सर्व घरे विकली आहेत. ते आता स्पेस एक्सच्या प्रकल्पाजवळच छोटेखानी घरात राहणार आहेत. हे घरही कधीही उचलून नेता येईल असे आहे.

टेस्ला आणि स्पेस् एक्स सारख्या कंपन्यांचे मालक आणि जगातील सर्वात मोठे अब्जाधीश एलन मस्क (Elon Musk) यांचा गर्लफ्रेंड ग्रीम्ससोबतचा संसार मोडला आहे. या दोघांनी तीन वर्षांच्या रिलेशनशिपनंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, दोघांमध्ये संबंध चांगले आहेत. मस्क यांनी एका मुलाखतीमध्ये ही माहिती दिली. यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या मुलाचा ताबा कोणाकडे असेल यावर चर्चांना उत आला आहे. (Elon Musk says he and Grimes are 'semi-separated')

Tata Group : टाटा की मुकेश अंबानींची रिलायन्स? किती विश्वासू आहेत या कंपन्या, जाणून घ्या सर्व्हेचा निकाल

मस्क यांनी त्यांच्या मुलाचे नाव X Æ A-Xii असे विचित्र ठेवले आहे. मस्क यांनी एका कामासाठी आपली सर्व घरे विकली आहेत. ते आता स्पेस एक्सच्या प्रकल्पाजवळच छोटेखानी घरात राहणार आहेत. हे घरही कधीही उचलून नेता येईल असे आहे. यामुळे मस्क यांनी हा वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या त्यांचा मुलगा हा गर्लफ्रेंड ग्रीम्ससोबत आहे. दोघं मिळून त्याचे संगोपन करतील असे मस्क म्हणाले.  आम्ही सेमी सेपरेट झालो आहोत. मला कामासाठी टेक्सासला किंवा फिरतीवर रहावे लागते तर ग्रीम्स गायिका असल्याने तिला लॉस अँजेलिसला रहावे लागते. 

Girish Mathrubhootam: मालक असावा तर असा! आपल्या 500 कर्मचाऱ्यांना करोडपती केले, अपार कष्ट झेलले

या नंतर ट्विटरवर लोकांनी प्रश्नांची सरबत्ती केली. त्यांना सर्वाधिक रुची त्यांच्या मुलामध्ये होती. त्याची कस्टडी कोणाकडे राहणार असा प्रश्न बहुतेक लोक विचारत आहेत. दुसरीकडे त्याच्या या विचित्र नावाबाबतही लोक वेगवेगळे बोलत आहेत. हे नाव कसे उच्चारायचे असेही विचारले जात आहे. तर काहींनी टिंगल कररत जर मस्क नाव विसरले तर ते बेबी एक्स अशी हाक मारतील असे म्हटले आहे.

अमेरिकेच्या CIA वर भारतात झाला जगातील सर्वात रहस्यमय हल्ला; सुपरपॉवर 'हवाना सिंड्रोम'मुळे हतबल

ग्रीम्सने एकदा या नावाचा अर्थ सांगितला होता. तेव्हा तो कोणाच्या लक्षात आला नाही. X Æ A-12 हे नाव एलन आणि ग्रीम्सच्या आवडत्या विमानाचे आहे, असे सांगितले जाते. अनेकांना तर हे जोडपे लोकांची मस्करी करत असल्याचे वाटते. अशाप्रकारे वेगळे होणारे मस्क हे जगातील तिसरे अब्जाधीश आहेत. याआधी अॅमेझॉ़नचे मालक जेफ बेझोस आणि मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स हे त्यांच्या पत्नींपासून विभक्त झाले आहेत. मस्क यांचे प्रकरण जरा वेगळे आहे. 

टॅग्स :Teslaटेस्ला