Girish Mathrubhootam: मालक असावा तर असा! आपल्या 500 कर्मचाऱ्यांना करोडपती केले, अपार कष्ट झेलले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 02:25 PM2021-09-23T14:25:24+5:302021-09-23T14:30:37+5:30

Girish Mathrubhootam Freshworks IPO: तामिळनाडूच्या त्रिचीमध्ये 700 स्केअर फुटाचे गोडाऊन सुरु करणाऱ्या त्यांच्या कंपनीने आज अमेरिकेच्या शेअर बाजारत धमाल उडविली आहे.

बिझनेस सॉफ्टवेअर बनविणारी भारतीय कंपनी Freshworks अमेरिकेच्या शेअर बाजारात Nasdaq लिस्ट झाली आहे. याद्वारे कंपनीने 1 अब्ज डॉलरहून अधिकची रक्कम जमा केली आहे, याचबरोबर कंपनीचे शेकडो कर्मचारी रातोरात करोडपती बनले आहेत. (Freshworks IPO creates more than 500 crorepatis in India, with 70 of them aged below 30)

या कंपनीचे फाऊंडर गिरीश मात्रूभूतम (Girish Mathrubhootam) यांनी रजनीकांतसारखी कमाल करून दाखविली आहे. तामिळनाडूच्या त्रिचीमध्ये 700 स्केअर फुटाचे गोडाऊन सुरु करणाऱ्या त्यांच्या कंपनीने आज अमेरिकेच्या शेअर बाजारत धमाल उडविली आहे.

जवळपास 1.3 अब्ज डॉलर जमविले असून 500 हून अधिक कर्मचाऱ्यांना करोडपती बनविले आहे. महत्वाचे म्हणजे यातील 70 कर्मचारी हे 30 वर्षांपेक्षाही कमी वयाचे आहेत. काहींनी तर नुकतेच शिक्षण पूर्ण केले होते.

फ्रेशवर्कचे ऑफिस चेन्नई आणि अमेरिकेच्या San Mateo मध्ये आहे. ही सॉफ्टवेयर ऐज अ सर्विस (SaaS) कंपनी आहे. कंपनीचा अमेरिकेत आयपीओ आला आहे.

CEO गिरीश मात्रूभूतम आणि सुरुवातीचे गुंतवणूकदार एक्सेल आणि सिकोइया यांना या आयपीओमुळे फायदा झाला आहे. गिरीश हे रजनिकांतचे चाहते आहेत आणि त्यांना रोल मॉडेल मानतात.

कंपनीच्या 76 टक्के कर्मचाऱ्यांकडे कंपनीचे शेअर होते. काही तरुण कर्मचाऱ्यांनी देखील पगारातील काही रक्कम बाजुला काढून कंपनीचे शेअर विकत घेतले होते.

Freshworks ने दोन वर्षांपूर्वी 3.5 अब्ज डॉलरच्या व्हॅल्यूएशनवर सिकोईया कॅपिटल आणि एक्सेल सारख्या गुंतवणूकदारांकडून 15.4 कोटी डॉलरचा फंड मिळविला होता. यामुळे कंपनी एकदा का लिस्टेड झाली की शेअर वाढणार याची कल्पना या कर्मचाऱ्यांना होती. यामुळे या कर्मचाऱ्यांनी हे शेअर घेऊन ठेवले होते. त्याचा त्यांना फायदा झाला आहे.