चिकनच्या किमतीपेक्षा अंडी झाली महाग, भाज्यांचे दरही गगनाला; बांगलादेशात सगळाच गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 13:14 IST2025-05-17T13:14:10+5:302025-05-17T13:14:36+5:30
Bangladesh Chicken Egg prices: भाव वाढले, एक डझन अंडी कितीला? वाचा सविस्तर

चिकनच्या किमतीपेक्षा अंडी झाली महाग, भाज्यांचे दरही गगनाला; बांगलादेशात सगळाच गोंधळ
Bangladesh Chicken Egg prices: मांसाहारी लोकांना प्रश्न विचारला की, चिकन महाग की अंडे? तर कुणीही उत्तर देईल चिकन! पण सध्या बांगलादेशात सगळाच गोंधळ उडाला आहे. येथे अंड्यांच्या किमती गगनाला भिडत आहेत आणि चिकन मात्र एक स्वस्तात मिळून लागलंय. बांगलादेशची राजधानी ढाकामध्ये सकाळपासूनच रामपुरा, मालीबाग, खिलगाव तलताला आणि शेजुनबागीचा या प्रमुख भाजीपाला बाजारांमधील परिस्थिती काहीशी वेगळीच दिसू लागलीये. एका आठवड्यात अंड्यांच्या किमतीत प्रति डझन १० रुपयांनी वाढ झाली आहे, तर ब्रॉयलर चिकनच्या किमतीत १० ते २० रुपयांनी घट झाली आहे. तसेच, भाज्यांचे दरही उच्चांक गाठत आहेत. काही मोजक्याच भाज्या खिशाला परवडणाऱ्या दरात मिळताना दिसत आहेत.
अंड्यांचा भाव वाढला...
एकेकाळी प्रोटीन्ससाठी सर्वात स्वस्त पर्याय मानली जाणारी अंडी आता सामान्य खरेदीदारांच्या आवाक्याबाहेर असल्याचे दिसून येते आहे. सध्या, मोठ्या बाजारपेठांमध्ये अंडी प्रति डझन १४० रुपये आणि रिटेल बाजारात १४५ रुपये प्रति डझन दराने विकली जात आहेत. एका आठवड्यापूर्वी ही किंमत १३०-१३५ रुपये होती. माळीबाग मार्केटमधील अंडी विक्रेते अबुल हुसेन म्हणाले की, शेतकऱ्यांना अनेक महिन्यांपासून नुकसान सहन करावे लागत होते. यावेळी जर किमती थोड्या वाढल्या असतील, तर त्यांच्यासाठी ते आवश्यक होते. अनेक शेतीचे पर्याय बंद आहेत. साधारणपणे पावसाळ्यात अंड्यांच्या किमती वाढतात, परंतु यावेळी आतापासूनच किमती वाढल्या आहेत.
चिकन बनतंय 'स्वस्त प्रोटीन्स'
अंडी महाग झाली असली तरी, चिकनच्या किमतीत घट झाली आहे. ब्रॉयलर चिकन आता १६० ते १८० रुपये प्रति किलो दराने विकले जात आहे, जे गेल्या आठवड्यापेक्षा १०-२० रुपये कमी आहे. याचा अर्थ असा की आता बांगलादेशातील जेवणाच्या प्लेटमध्ये चिकन असणे स्वस्त होऊ शकते. भाजीपाला बाजाराची अवस्था अजूनही वाईट आहे. पडवळ आणि दुधीसारख्या काही उन्हाळी भाज्या ४०-६० रुपये प्रति किलो दराने विकल्या जात आहेत, तर चिचिंगा, कोळंबी, करोंडा, उस्ता, वांगी आणि बरबती ५०-६० रुपये प्रति किलो दराने उपलब्ध आहेत. लोक म्हणतात की उन्हाळी भाज्यांचा पुरवठा वाढला आहे, त्यामुळे किमती थोड्या कमी झाल्या आहेत. पण जर अवकाळी पाऊस पडला तर किमती वाढतात.