एक दोन नाही, तर दररोज 1000 भूकंपाचे धक्के...'या' देशातील नागरिकांनी केले पलायन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 15:04 IST2025-02-17T15:03:20+5:302025-02-17T15:04:14+5:30

तज्ञांच्या माहितीनुसार, 26 जानेवारी ते 13 फेब्रुवारीदरम्यान 18,400 पेक्षाही जास्त भूकंपाचे धक्के जाणवले.

earthquake 1000 tremors per day amorgos greece | एक दोन नाही, तर दररोज 1000 भूकंपाचे धक्के...'या' देशातील नागरिकांनी केले पलायन

एक दोन नाही, तर दररोज 1000 भूकंपाचे धक्के...'या' देशातील नागरिकांनी केले पलायन


Earthquake : भूकंपामुळे जमीन दुभंगणे, इमारती पडणे, भूस्खलन, पूर अशाप्रकारच्या घटना घडतात. जगभरात अनेक ठिकाणी सातत्याने भूकंपाचे धक्के जाणवतात. साधारणपणे भूकंपाचा एखादा जरी धक्का जाणवला तर लोकांमध्ये प्रचंड घबराट पसरते. पण, जगात असा एक असे ठिकाण आहे, जिथे दररोज सरासरी 1000 भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. हे ठिकाण ग्रीस देशातील अमोरगोस आहे.

न्यूज एजन्सी एएफपीने अथेन्स विद्यापीठाच्या सिस्मॉलॉजी प्रयोगशाळेचा हवाला देत सांगितले की, 26 जानेवारी ते 13 फेब्रुवारी दरम्यान सायक्लेड द्वीपसमूहाच्या बेटांवर 18,400 हून अधिक भूकंपांची नोंद झाली आहे. भूकंपामुळे अमोरगोसमध्ये इमरजन्सीची परिस्थिती कायम आहे.

5.3 रिश्टर स्केलचा भूकंप
ग्रीसमधील सँटोरिन बेटावर दररोज भूकंपाचे धक्के बसत आहेत, मात्र 10 फेब्रुवारीला सर्वात शक्तिशाली भूकंप जाणवला. या दिवशी येथे 5.3 रिश्टर स्केलचा भूकंप जाणवला. येथे रिश्टर स्केलवर फक्त 4 किंवा जवळपासचे भूकंप जाणवत आहेत. मात्र, दररोज भूकंपाचे धक्के बसत असल्याने येथील नागरिक चिंताग्रस्त झाले आहेत. भूगर्भशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, अमोरगोस 6 दबाव क्षेत्रांनी वेढलेला आहे, ज्यामुळे या भागात सर्वाधिक भूकंप येत आहेत. 

1956 मध्ये झालेला मोठा भूकंप
1956 मध्ये या भागात शक्तिशाली भूकंप झाला होता. यंदाच्या भूकंपाची तीव्रता 7.5 आणि 7.7 इतकी नोंदवण्यात आली आहे. या भूकंपानंतर स्थानिकांमध्ये प्रचंड घबराटीचे वातावरण आहे. भूकंपामुळे येथील शाळा बंद करण्यात आल्या आहेत, तर अनेकांनी घरे सोडून इतर शहरांमध्ये स्थलांतर केले आहे. अमोरगोस पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. येथे दरवर्षी सुमारे 1 लाख पर्यटक येतात. भूकंपामुळे यावेळी येथील पर्यटकांच्या संख्येवरही परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Web Title: earthquake 1000 tremors per day amorgos greece

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.