हमासशी युद्धादरम्यान इस्रायलचा गाझावर जोरदार हल्ला, २४ तासांत १५० पॅलेस्टाइन नागरिक ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2024 04:28 PM2024-02-01T16:28:52+5:302024-02-01T16:29:38+5:30

एका शाळेत उभारलेल्या दहशतवादी तळाला केलं लक्ष्य

During the war with Hamas Israel made heavy attack on Gaza kills 150 Palestinians in 24 hours | हमासशी युद्धादरम्यान इस्रायलचा गाझावर जोरदार हल्ला, २४ तासांत १५० पॅलेस्टाइन नागरिक ठार

हमासशी युद्धादरम्यान इस्रायलचा गाझावर जोरदार हल्ला, २४ तासांत १५० पॅलेस्टाइन नागरिक ठार

Israel Hamas War, Attack on Palestine: इस्रायल आणि हमास यांच्यात ७ ऑक्टोबर २०२३ पासून सुरू झालेल्या युद्धात आतापर्यंत दोन्ही देशांतील २६ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलने पुन्हा एकदा गाझावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात गेल्या २४ तासांत सुमारे १५० जणांना जीव गमवावा लागला आहे. तर ३१३ जण जखमी झाले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इस्त्रायली लष्कराने बुधवारी उत्तर गाझामध्ये हमासच्या १५ हून अधिक दहशतवाद्यांना ठार केल्याचे सांगितले होते. त्यांनी एका शाळेत उभारलेल्या दहशतवादी तळालाही लक्ष्य केले.

इस्रायलचे भारतातील राजदूत नाओर गिलन यांनी ज्यू लोकांचा सुरू असलेला नरसंहार (होलोकॉस्ट) संघर्ष सर्वात वाईट असल्याचे वर्णन केले. दुसऱ्या महायुद्धादरम्यान, नाझी जर्मनी आणि त्याच्या मित्र राष्ट्रांनी लाखो ज्यू मारले होते ज्याला होलोकॉस्ट म्हणून ओळखले जाते. गिलन म्हणाले की, गाझामध्ये अजूनही १३६ अपहरण झालेले लोक अमानवीय परिस्थितीत जगत आहेत. त्याचवेळी इस्रायलच्या राजदूताने गाझामध्ये सुरू असलेल्या संघर्षावर भारत सरकारच्या भूमिकेचे कौतुक केले.

हमासच्या मागण्या फेटाळल्या

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबण्याची चिन्हे सध्या तरी दिसत नाहीत. कारण पीएम नेतन्याहू यांनी हमासच्या दोन प्रमुख मागण्या फेटाळल्या आहेत. ते म्हणाले की, इस्रायल गाझा पट्टीतून माघार घेणार नाही किंवा हजारो दहशतवाद्यांना सोडणार नाही. युद्धबंदीच्या चर्चेत या दोन गोष्टी हमासच्या मुख्य अटी आहेत. पण हमासच्या मागण्या फेटाळण्यात आल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयावर आक्षेप

नेतन्याहू यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या नुकत्याच दिलेल्या निर्णयावर टीका केली होती. आम्ही आमच्या देशाच्या आणि लोकांच्या सुरक्षेसाठी वचनबद्ध आहोत, असे ते म्हणाले होते. आमच्या लोकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती पावले उचलू. प्रत्येक देशाप्रमाणे इस्रायललाही आपल्या अखंडतेचे रक्षण करण्याचा अधिकार आहे.

Web Title: During the war with Hamas Israel made heavy attack on Gaza kills 150 Palestinians in 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.