इस्रायल-हमास युद्धादरम्यान जपानचा पॅलेस्टाइनला मोठा धक्का, आर्थिंक मदत थांबवली!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 03:29 PM2024-01-29T15:29:11+5:302024-01-29T15:31:15+5:30

अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले, दाव्यांची कसून चौकशी करण्याचे आश्वासन

During Israel Hamas war Japan gives big blow to Palestine as it stopped the financial aid | इस्रायल-हमास युद्धादरम्यान जपानचा पॅलेस्टाइनला मोठा धक्का, आर्थिंक मदत थांबवली!

इस्रायल-हमास युद्धादरम्यान जपानचा पॅलेस्टाइनला मोठा धक्का, आर्थिंक मदत थांबवली!

Israel Hamas War - Japan setback to Palestine: इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध बऱ्याच काळापासून सुरू आहे. युद्धादरम्यान, अमेरिकेसह ६ देशांनी संयुक्त राष्ट्रांच्या एजन्सी UNRW ला निधी देणे थांबवले आहे. इस्रायलने UNRWA नावाच्या संघटनेच्या १२ कर्मचाऱ्यांवर ७ ऑक्टोबरच्या हल्ल्यात हमासच्या दहशतवाद्यांसह सहभागी असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता जपाननेही UNRWA ला दिलेला निधी थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. जपानचा हा निर्णय म्हणजे पॅलेस्टाइनला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धात दररोज अनेकांना जीव गमवावा लागत आहे हे लक्षात घेऊन अनेक देश निर्वासितांसाठी UNRWA ला निधी देत ​​होते. पण इस्रायलने UNRWA नावाच्या संस्थेच्या १२ कर्मचाऱ्यांवर ७ ऑक्टोबरच्या हल्ल्यात हमासच्या दहशतवाद्यांचा हात असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आतापर्यंत अमेरिका, ब्रिटन, नेदरलँड, स्वित्झर्लंड, फिनलँड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, जर्मनी आणि इटलीने UNRWA ला निधी न देण्याची घोषणा केली आहे.

जपानचे मत काय?

या मुद्द्यावर जपानने म्हटले आहे की, इस्रायलच्या आरोपानंतर पॅलेस्टाइनच्या निर्वासितांसाठी संयुक्त राष्ट्रांच्या एजन्सीला दिलेला निधी थांबवण्यात ते इतर देशांना सामील करत आहेत. एजन्सीने इस्रायलच्या आरोपांवरून अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे आणि दाव्यांची कसून चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे. तर इस्रायलने युद्धानंतर गाझामधील एजन्सीचे काम थांबवण्यासाठी पुढाकार घेतला होता. गेल्या वर्षी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात UNRWA कर्मचारी सदस्यांच्या कथित सहभाग असल्याचे जपानी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. जपानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे की या प्रकरणाची चौकशी केली जात आहे आणि आरोपांचे निराकरण करण्यासाठी उपायांवर विचार केला जात आहे.

Web Title: During Israel Hamas war Japan gives big blow to Palestine as it stopped the financial aid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.