जिवाची दुबई...! भारतीय जिंकला तब्बल 19 कोटींची लॉटरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2019 16:53 IST2019-02-03T16:08:42+5:302019-02-03T16:53:57+5:30

पोटापाण्यासाठी आखाती देशांत जाणाऱ्या भारतीयांमध्ये कमालीची वाढ होत आहे.

Dubai Dhamaka ...! Indian wins lottery 19 crore | जिवाची दुबई...! भारतीय जिंकला तब्बल 19 कोटींची लॉटरी

जिवाची दुबई...! भारतीय जिंकला तब्बल 19 कोटींची लॉटरी

अबुधाबी : पोटापाण्यासाठी आखाती देशांत जाणाऱ्या भारतीयांमध्ये कमालीची वाढ होत आहे. असेच नोकरीसाठी गेलेल्या एका भारतीयाचेदुबईत नशीब फळफळले आणि तो तब्बल 19 कोटींचा मालक बनला. 


दुबईतील खलीज टाईम्सच्या वृत्तामध्ये प्रशांत पंडाराथिल यांनी 4 जानेवारीला ऑनलाईन लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते. ही लॉटरी 1 कोटी दिरहॅम एवढी होती. ही रक्कम भारतीय रुपयात मोजायची झाल्यास तब्बल 19 कोटी एवढी होते.  प्रशांत यांना ही लॉटरी लागली. महत्वाचे म्हणजे, दुसरे बक्षीसही एन्य एका भारतीयालाच लागले आहे.


दुबईतील या लॉटरीच्या पहिल्या 10 विजेत्यांमध्ये सहा भारतीय आहेत. गेल्या महिन्यात अनिवासी भारतीय अभिषेक काथेल यांनी दुबईतील करमुक्त लॉटरीमध्ये 10 लाख डॉलर म्हणजेच 7.8 कोटी रुपये जिंकले होते. 

Web Title: Dubai Dhamaka ...! Indian wins lottery 19 crore