अचानक कारच्या छतावर चढून डान्स करू लागली महिला, मालकाने शिकवला असा धडा की...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2021 11:25 IST2021-09-03T11:23:13+5:302021-09-03T11:25:42+5:30

अचानक महिला एका कारच्या छतावर चढली आणि तिने डान्स सुरू केला. यामुळे कारमध्ये बसलेली व्यक्ती संतापली आणि त्यानंतर जे केलं ते व्हायरल झालं.

Driver punches a woman as she dances on his car roof in London | अचानक कारच्या छतावर चढून डान्स करू लागली महिला, मालकाने शिकवला असा धडा की...

अचानक कारच्या छतावर चढून डान्स करू लागली महिला, मालकाने शिकवला असा धडा की...

कारच्या छतावर चढून डान्स करणं एका महिलेला चांगलंच महागात पडलं. नाराज कार मालकाने तिला अशा धडा शिकवला की, ती आयुष्यभर लक्षात ठेवेल. ही घटना लंडनच्या फॉरेस्ट गेटवर सोमवारी दुपारी घडली. रेड लाइटमुळे सर्व गाड्या थांबल्या होत्या. तेव्हाच अचानक महिला एका कारच्या छतावर चढली आणि तिने डान्स सुरू केला. यामुळे कारमध्ये बसलेली व्यक्ती संतापली आणि त्यानंतर जे केलं ते व्हायरल झालं.

'द सन' च्या रिपोर्टनुसार, बॅंक हॉलिडेच्या दिवशी महिला अचानक रेड लाइटमुळे थांबली आणि कारच्या छतावर चढली. इतकंच नाही कारच्या छतावर ती डान्स करू लागली होती. महिलेचे मित्र काही अंतरावरून तिच्याकडे बघत होते. तेव्हाच कारमध्ये बसलेली व्यक्ती बाहेर आली आणि महिलेला काहीच इशारा न देता तिच्या पायावर एक बुक्की मारली.

कार मालकाने जशी महिलेला बुक्की मारली ती कारच्या दुसऱ्या बाजूला जाऊन पडली आणि हात जोडून मालकाची माफी मागू लागली होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झााल आहे. व्हिडीओत बघायला मिळालं की महिला काळ्या रंगाच्या कारवर जोरजोरात उड्या घेत आपल्या मित्रांना इशारा रत होती. तेव्हा काममधील व्यक्ती रागाने बाहेर आली आणि महिलेच्या पायावर त्याने बुक्की मारली.

अचानक झालेल्या हल्ल्यामुळे महिलेचा बॅलन्स बिघडला आणि ती कारवरून थेट खाली पडली. कारचा मालक तिच्याकडे गेला तेव्हा महिला हात जोडून माफी मागत होती. त्यानंतर कार मालक कार घेऊन तेथून निघून जातो. या व्हिडीओवर लोकांच्या वेगवेगळ्या रिअॅक्शन येत आहेत. काही लोक म्हणाले की, कार मालकाने महिलेला मारायला नको होतं. त्याने आधी तिला इशारा द्यायचा होता. जर तिने ऐकलं नसतं तर त्याने काही करायचं असतं. 
 

Web Title: Driver punches a woman as she dances on his car roof in London