'ड्रॅगन'नं दगा दिला, तर भारत मदतीसाठी धावून गेला; होर्मुझच्या कोंडीत अडकलेल्या 'या' देशाला दिलं खास कवच! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 11:25 IST2026-03-29T11:24:31+5:302026-03-29T11:25:06+5:30

सध्या या देशात इंधनाचे दर गगनाला भिडले असून. सरकारने चार दिवसांचा वर्किंग वीक लागू केला आहे. अशा परिस्थितीत भारताचे इंधन 'लाईफलाईन' ठरले आहे...

'Dragon' betrayed, India ran for power; Special protection was given to 'this' country stuck in the Hormuz dilemma sent 38000 metric tonnes of fuel to srilanka | 'ड्रॅगन'नं दगा दिला, तर भारत मदतीसाठी धावून गेला; होर्मुझच्या कोंडीत अडकलेल्या 'या' देशाला दिलं खास कवच! 

'ड्रॅगन'नं दगा दिला, तर भारत मदतीसाठी धावून गेला; होर्मुझच्या कोंडीत अडकलेल्या 'या' देशाला दिलं खास कवच! 


अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्या सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर 'होर्मुझची सामुद्रधुनी' (Strait of Hormuz) बंद झाल्याने संपूर्ण जगालाच ऊर्जा संकटाचा सामना करावा लागत आहे. या कठीण प्रसंगात भारताने श्रीलंकेला मुक्तहस्ते मदत केली आहे. भारताने श्रीलंकेला ३८००० मेट्रिक तेलाची मदत केली आहे. यात २०००० मेट्रिक टन डिझेल तर १८००० मेट्रिक टन पेट्रोलचा समावेश आहे. भारताच्या या मदतीनंतर श्रीलंकेने भारताप्रति जाहीरपणे कृतज्ञताही व्यक्त केली आहे.

कोलंबोतील भारतीय उच्चायुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, इराण युद्धामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली असताना ही मदत पोहोचवण्यात आली. यासंदर्भात श्रीलंकेचे विरोधी पक्षनेते सजिथ प्रेमदासा यांनी भारताचे आभार मानले आहेत. ते म्हणाले, "खऱ्या नात्याची ओळख संकटकाळातच होते आणि भारताने या कठीण प्रसंगी साथ देऊन हे सिद्ध केले." 

विशेष म्हणजे, श्रीलंकेने याच वर्षी जानेवारी महिन्यात चीनच्या नियंत्रणाखाली असलेल्या हंबनटोटा बंदराजवळ 200000 बॅरल क्षमतेची तेल रिफायनरी तयार करण्यासाठी चीनची सरकारी ऊर्जा कंपनी सिनोपेकसोबत तब्बल 3.7 अब्ज डॉलरचा करार केला  असूनही, या संकटकाळात चीनकडून श्रीलंकेला कुठलीही मदत मिळालेली नाही." यामुळे प्रेमदासा यांच्या या 'एक्स पोस्ट'कडे चीनवर अप्रत्यक्ष निशाण्याच्या स्वरुपात बघितले जात आहे.

पश्चिम आशियातील युद्धामुळे अनेक आंतरराष्ट्रीय पुरवठादारांनी इंधन देण्यास नकार दिला होता. अशा वेळी भारताने इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या (IOC) माध्यमातून हा पुरवठा सुनिश्चित केला. यापूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुर कुमार डिसानायके यांच्यात यासंदर्भात चर्चा जाली होती. सध्या श्रीलंकेत इंधनाचे दर गगनाला भिडले असून. सरकारने चार दिवसांचा वर्किंग वीक लागू केला आहे. अशा परिस्थितीत भारताचे इंधन श्रीलंकेसाठी 'लाईफलाईन' ठरले आहे.
 

Web Title : होरमुज़ संकट में भारत ने श्रीलंका की मदद की, चीन गायब

Web Summary : होरमुज़ जलडमरूमध्य संकट के बीच, भारत ने श्रीलंका को डीजल और पेट्रोल सहित महत्वपूर्ण ईंधन सहायता प्रदान की। श्रीलंका ने आभार व्यक्त किया, चीन की अनुपस्थिति को विपरीत बताया, जबकि पहले समझौते हुए थे। यह जीवन रेखा श्रीलंका को बढ़ते ईंधन की कीमतों और कम काम के सप्ताह से निपटने में मदद करती है।

Web Title : India Aids Sri Lanka Amidst Hormuz Strait Crisis, China Absent

Web Summary : Amidst the Hormuz Strait crisis, India provided vital fuel aid to Sri Lanka, including diesel and petrol. Sri Lanka expressed gratitude, contrasting China's absence despite prior deals. This lifeline helps Sri Lanka combat soaring fuel prices and a shortened work week.