शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
4
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
5
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
6
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
7
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
8
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
9
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
10
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
11
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
12
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
13
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
14
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
15
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
16
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
17
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
18
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
Daily Top 2Weekly Top 5

डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेत मोठी चूक! विमानात बसणारच होते, तेवढ्यात...; उडाली एकच खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 12:23 IST

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचे समोर आले आहे. फ्लोरिडातील पाम बीच येथील ट्रम्प यांच्या 'मार-ए-लागो' ...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचे समोर आले आहे. फ्लोरिडातील पाम बीच येथील ट्रम्प यांच्या 'मार-ए-लागो' निवासस्थानाजवळ रविवारी एका नागरी विमानाने 'नो-फ्लाय झोन'चे उल्लंघन केले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. यानंतर, खबरदारी म्हणून तातडीने एफ-१६ लढाऊ विमाने तैनात करण्यात आली. विशेष म्हणजे, ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळी ट्रम्प तेथेच होते आणि वॉशिंग्टन डीसीसाठी उड्डाण करणार होते.

तात्पुरत्या उड्डाण निर्बंधांचे उल्लंघन -नॉर्थ अमेरिकन एरोस्पेस डिफेन्स कमांडने (NORAD) दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी १:१५ च्या सुमारास एका नागरी विमानाने तात्पुरत्या उड्डाण निर्बंधांचे उल्लंघन केले. खरेतर, राष्ट्राध्यक्ष ज्या भागात उपस्थित असतात, तिथे सुरक्षेसाठी नो-फ्लाय झोन लागू केला जातो. या विमानाला रोखण्यासाठी आणि वैमानिकाचे लक्ष वेधण्यासाठी हवाई दलाच्या विमानांनी 'फ्लेयर्स'चा वापर केला. या कारवाईमुळे जमिनीवरील नागरिकांना कोणताही धोका नव्हता, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

यापूर्वीही घडल्या आहेत अशा घटनाNORAD ने दिलेल्या माहितीनुसार, ट्रम्प पुन्हा राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून, अशा प्रकारच्या अनेक घटनांची नोंद झाली आहे. मात्र, दर वेळी कुठलाही धोका निर्माण होणयापूर्वी प्रकरण निस्तरण्यात आले. या घटनेनंतर पाम एअरपोर्टवरील व्यवहार पुन्हा सुरळीत झाले असून सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हेलिकॉप्टरच्या सहाय्याने संपूर्ण एअरस्पेसची कसून तपासणी केली.

व्हाईट हाऊसचाही दुजोरा -व्हाईट हाऊस आणि सीक्रेट सर्विसनेही या घटनेला दुजोरा दिला आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प किंवा त्यांच्या विमानावर याचा कोणताही परिणाम झाला नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. संबंधित विमानाचा एअरपोर्ट कंट्रोल टॉवरशी असलेला संपर्क अचानक तुटल्याने ही घटना घडली. याशिवाय, विमानतळावर कोणत्याही प्रकारची संशयास्पद ड्रोन हालचाल आढळली नसल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Trump Security Breach: Plane Violates No-Fly Zone; Scramble Ensues

Web Summary : A civilian plane violated a no-fly zone near Trump's Florida residence, triggering a security alert. F-16 fighter jets were deployed. Trump was present, preparing to fly to Washington D.C. Authorities confirmed no impact on Trump or his aircraft. The incident is under investigation.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाUSअमेरिकाairplaneविमान