डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेत मोठी चूक! विमानात बसणारच होते, तेवढ्यात...; उडाली एकच खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 12:23 IST2026-03-30T12:22:59+5:302026-03-30T12:23:22+5:30

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचे समोर आले आहे. फ्लोरिडातील पाम बीच येथील ट्रम्प यांच्या 'मार-ए-लागो' ...

Donald Trump's security blunder plane-enters-nofly-zone There was a stir | डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेत मोठी चूक! विमानात बसणारच होते, तेवढ्यात...; उडाली एकच खळबळ

डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेत मोठी चूक! विमानात बसणारच होते, तेवढ्यात...; उडाली एकच खळबळ

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचे समोर आले आहे. फ्लोरिडातील पाम बीच येथील ट्रम्प यांच्या 'मार-ए-लागो' निवासस्थानाजवळ रविवारी एका नागरी विमानाने 'नो-फ्लाय झोन'चे उल्लंघन केले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. यानंतर, खबरदारी म्हणून तातडीने एफ-१६ लढाऊ विमाने तैनात करण्यात आली. विशेष म्हणजे, ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळी ट्रम्प तेथेच होते आणि वॉशिंग्टन डीसीसाठी उड्डाण करणार होते.

तात्पुरत्या उड्डाण निर्बंधांचे उल्लंघन -
नॉर्थ अमेरिकन एरोस्पेस डिफेन्स कमांडने (NORAD) दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी १:१५ च्या सुमारास एका नागरी विमानाने तात्पुरत्या उड्डाण निर्बंधांचे उल्लंघन केले. खरेतर, राष्ट्राध्यक्ष ज्या भागात उपस्थित असतात, तिथे सुरक्षेसाठी नो-फ्लाय झोन लागू केला जातो. या विमानाला रोखण्यासाठी आणि वैमानिकाचे लक्ष वेधण्यासाठी हवाई दलाच्या विमानांनी 'फ्लेयर्स'चा वापर केला. या कारवाईमुळे जमिनीवरील नागरिकांना कोणताही धोका नव्हता, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

यापूर्वीही घडल्या आहेत अशा घटना
NORAD ने दिलेल्या माहितीनुसार, ट्रम्प पुन्हा राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून, अशा प्रकारच्या अनेक घटनांची नोंद झाली आहे. मात्र, दर वेळी कुठलाही धोका निर्माण होणयापूर्वी प्रकरण निस्तरण्यात आले. या घटनेनंतर पाम एअरपोर्टवरील व्यवहार पुन्हा सुरळीत झाले असून सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हेलिकॉप्टरच्या सहाय्याने संपूर्ण एअरस्पेसची कसून तपासणी केली.

व्हाईट हाऊसचाही दुजोरा -
व्हाईट हाऊस आणि सीक्रेट सर्विसनेही या घटनेला दुजोरा दिला आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प किंवा त्यांच्या विमानावर याचा कोणताही परिणाम झाला नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. संबंधित विमानाचा एअरपोर्ट कंट्रोल टॉवरशी असलेला संपर्क अचानक तुटल्याने ही घटना घडली. याशिवाय, विमानतळावर कोणत्याही प्रकारची संशयास्पद ड्रोन हालचाल आढळली नसल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Web Title : ट्रंप की सुरक्षा में चूक: विमान ने नो-फ्लाई जोन का उल्लंघन किया

Web Summary : फ्लोरिडा में ट्रंप के आवास के पास एक नागरिक विमान द्वारा नो-फ्लाई जोन का उल्लंघन करने से सुरक्षा अलर्ट जारी किया गया। एफ-16 लड़ाकू विमान तैनात किए गए। ट्रंप वाशिंगटन डी.सी. जाने की तैयारी में थे। अधिकारियों ने ट्रंप या उनके विमान पर कोई प्रभाव न पड़ने की पुष्टि की है। घटना जांच के अधीन है।

Web Title : Trump Security Breach: Plane Violates No-Fly Zone; Scramble Ensues

Web Summary : A civilian plane violated a no-fly zone near Trump's Florida residence, triggering a security alert. F-16 fighter jets were deployed. Trump was present, preparing to fly to Washington D.C. Authorities confirmed no impact on Trump or his aircraft. The incident is under investigation.