टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 15:08 IST2025-04-21T15:07:33+5:302025-04-21T15:08:52+5:30

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक नवीन आदेश जारी केला आहे. ट्रम्प यांनी ९० दिवसांच्या शुल्कवाढीवर स्थगिती दिल्यानंतर नॉन-टॅरिफ फसवणुकीची यादी जाहीर केली आहे.

donald Trump's new order after tariffs 'non-tariff fraud' list of 8 issues announced | टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर

टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ९० दिवसांच्या आयात शुल्कावरील बंदी लादल्यानंतर आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. ट्रम्प यांनी नॉन-टेरिफ फसवणूकशी संबंधित गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ८ मुद्द्यांची यादी जाहीर केली आहे. 

ट्रम्प म्हणाले की, जर कोणत्याही देशाने नॉन-टेरिफ फसवणूक केली तर ते त्या देशाचे अमेरिकेशी असलेले संबंध बिघडवू शकते. ट्रम्प यांच्या या नवीन इशाऱ्यामुळे अनेक देशांच्या अडचणी वाढू शकतात. जगभरात व्यापार युद्धाचा धोका आधीच निर्माण झाला आहे. आता नॉन-टॅरिफ फसवणुकीची यादी अडचणी निर्माण वाढू शकतात.

Pope Francis: पोप फ्रान्सिस यांचं निधन, दीर्घ आजारपणानंतर व्हॅटिकन सिटी येथे घेतला अखेरचा श्वास

डोनाल्ड ट्रम्प यांच्या मते, काही देश त्यांच्या बाजारपेठेत अमेरिकन उत्पादने महाग करण्यासाठी आणि अमेरिकेत त्यांची निर्यात स्पर्धात्मक ठेवण्यासाठी जाणूनबुजून त्यांच्या चलनांचे अवमूल्यन करतात. याशिवाय, ट्रम्प म्हणाले की अनेक देश आयातीवर व्हॅट लावतात. कमी पैशात वस्तू टाकणे चुकीचे आहे. याशिवाय, निर्यातीवर कोणतेही सरकारी अनुदान नसावे.

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, किमतीपेक्षा कमी डंपिंग, निर्यातीवर सरकारी अनुदाने आणि शुल्क टाळण्यासाठी ट्रान्सशिपिंग हे पूर्णपणे चुकीचे आहे. ट्रम्प यांनी जपानच्या 'बॉलिंग बॉल टेस्ट'चाही उल्लेख केला.

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, जपानमध्ये अमेरिकन गाड्या विकल्या जाऊ नयेत म्हणून जपान 'बॉलिंग बॉल टेस्ट'ची मदत घेत आहेत . या प्रक्रियेदरम्यान, २० फूट उंचीवरून अमेरिकन कारवर बॉलिंग बॉल टाकले जातात. अशा परिस्थितीत, जर एखाद्या अमेरिकन कारच्या हुडवर डेंट असेल तर ती कार जपानी बाजारात विकता येणार नाही. ही प्रक्रिया खूपच भयावह आहे.

शुल्कांवर बंदी घालण्यात आली

डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन वगळता सर्व देशांवर लादलेला टॅरिफ ९० दिवसांसाठी पुढे ढकलला आहे. ट्रम्प म्हणाले की, ७५ हून अधिक देश अमेरिकेशी चर्चा करत आहेत. म्हणूनच त्यांनी ९० दिवसांसाठी शुल्कवाढ थांबवली आहे. या कालावधीत, सर्व देशांवर फक्त १० टक्के परस्पर शुल्क लागू असेल.

Web Title: donald Trump's new order after tariffs 'non-tariff fraud' list of 8 issues announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.