शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
2
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
3
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
4
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
5
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
6
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान
8
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
9
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
10
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
11
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
12
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
13
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
14
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
15
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
16
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
17
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
18
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
19
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
20
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

डोनाल्ड ट्रम्प यांची वडिलांना टॅक्स चोरीमध्ये मदत; बदल्यात 41 कोटी डॉलर मिळाले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2018 2:58 PM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आज आणखी एका वादात सापडले आहेत. डोनाल्ड यांनी त्यांचे वडील फ्रेड ट्रम्प यांना करचोरी साठी मदत केली होती.

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आज आणखी एका वादात सापडले आहेत. डोनाल्ड यांनी त्यांचे वडील फ्रेड ट्रम्प यांना करचोरी साठी मदत केली होती. याबदल्यात त्यांना तब्बल 41 कोटी डॉलरची संपत्ती मिळाली होती. याबाबतचा खुलासा अमेरिकेतील एका आघाडीच्या वृत्तपत्राने केला आहे. 

‘द न्यूयॉर्क टाइम्स’ने मंगवारी एक अहवाल छापला आहे. यामध्ये हा खळबळजनक दावा करण्यात आला आहे. ट्रम्प हे स्वत:ला स्वकर्तुत्वावर अब्जाधीश झाल्याचे सांगतात. ते म्हणतात की, फ्रेड ट्रम्प यांच्याकडून केवळ 10 अबेज डॉलर कर्ज घेतले होते. त्यातून त्यांनी उद्योगविश्व उभे केले. मात्र, खरी गोष्ट वेगळीच आहे. 

न्यूयॉर्क टाईम्सने एक लाख कागदपत्रे आणि ट्रम्प यांच्या कुटुंबाशी जोडले गेलेल्या लोकांच्या हवाल्याने टॅक्स चोरीचा खुलासा केला आहे. मात्र, ट्रम्प यांच्या वकिलांनी ही बाब खोटी असल्याचे म्हटले आहे. या अहवालानंतर अमेरिकी कर खात्याने चौकशी सुरु केली आहे. 90 च्या दशकात ट्रम्प यांची आई आणि वडील फ्रेड यांनी 7300 कोटी रुपयांची संपत्ती मुलांना भेट केली होती. यावर 4015 कोटींचा कर भरावा लागणार होता. ट्रम्प आणि त्यांच्या भावंडांनी खोटी माहीती देऊन हा कर केवळ 403 कोटी रुपये केला होता. यामुळे त्यांना 55 टक्क्यांऐवजी 5 टक्केच कर द्यावा लागला होता. अशा प्रकारे त्यांनी 3600 कोटी रुपयांचा कर चोरी केली होती. 

यासाठी ट्रम्प यांनी एक बोगस कंपनी ऑल काऊंटी बिल्डिंग सप्लाई अँड मेन्टेनन्स बनविली. ही कंपनी केवळ कागदावरच होती. कंपनीच्या रेकॉर्डमध्ये मोठ्या प्रमाणावर बिल्डिंग मटेरिअल करेदीचे आकडे दाखविण्यात आले. या आकड्यांच्या आडून ट्रम्प आणि त्यांच्या भावंडांना फ्रेड यांच्याकडून पैसे पाठविले जात होते. 

तर दुसऱ्या प्रकारात फ्रेड आणि त्यांच्या पत्नीने एक ट्रस्ट स्थापन केली होती. ही ट्रस्ट 55 टक्क्यांचा कर वाचवून संपत्ती मुलांच्या नावे करण्यासाठीच बनविण्यात आली होती. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पIncome Taxइन्कम टॅक्सTaxकरAmericaअमेरिका