ट्रम्प यांचा 'विनाशकारी' प्लॅन तयार! इराणमध्ये 'ग्राउंड ऑपरेशन'चे संकेत; आता अमेरिकेच्या अटींवरच युद्ध संपेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 21:26 IST2026-03-31T21:09:44+5:302026-03-31T21:26:51+5:30

मध्य पूर्वेतील सध्याच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने एक महत्त्वपूर्ण निवेदन जारी केले आहे. मंगळवारी पेंटागॉनमध्ये पत्रकारांशी बोलताना, अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ आणि जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफचे अध्यक्ष जनरल डॅन केन म्हणाले की, इराणसोबत सुरू असलेल्या युद्धात येणारे दिवस निर्णायक असतील.

donald trump's 'devastating' plan ready Signs of 'ground operation' in Iran; The war will now end on America's terms | ट्रम्प यांचा 'विनाशकारी' प्लॅन तयार! इराणमध्ये 'ग्राउंड ऑपरेशन'चे संकेत; आता अमेरिकेच्या अटींवरच युद्ध संपेल

ट्रम्प यांचा 'विनाशकारी' प्लॅन तयार! इराणमध्ये 'ग्राउंड ऑपरेशन'चे संकेत; आता अमेरिकेच्या अटींवरच युद्ध संपेल

मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने निवेदन प्रसिद्ध केले."इराणसोबतच्या संघर्षात येणारे काही दिवस अत्यंत निर्णायक असतील आणि हे युद्ध केवळ राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अटींवरच थांबेल," असे अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे. मंगळवारी पेंटागॉनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत हेगसेथ आणि जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफचे अध्यक्ष जनरल डॅन केन यांनी अमेरिकेची आक्रमक भूमिका मांडली.

इराणची मोठी खेळी! 'या' देशाच्या जहाजांना होर्मुझमध्ये 'फ्री एन्ट्री'; अमेरिकेच्या नाकावर टिच्चून घेतला निर्णय

इराणविरुद्ध सुरू असलेल्या 'ऑपरेशन एपिक फ्युरी' या आक्रमक मोहिमेवरील एका माहिती सत्रात, हेगसेथ यांनी सांगितले की, हा संघर्ष संपवण्यासाठी वॉशिंग्टन वाटाघाटींमध्ये सक्रियपणे सहभागी आहे. जर कोणताही करार झाला नाही, तर अमेरिका पुढील चार ते आठ आठवड्यांसाठी ही मोहीम पूर्ण ताकदीने सुरू ठेवण्यास पूर्णपणे तयार आहे. वाटाघाटी सुरू आहेत आणि त्या अधिक तीव्र होत आहेत, परंतु हा संघर्ष केवळ राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या अटींवरच संपेल, असेही ते म्हणाले.

दरम्यान, जनरल डॅन केन यांनी सांगितले की, अमेरिकी सैन्य इराणच्या लष्करी क्षमता सातत्याने नष्ट करत आहे. "आम्ही त्यांच्या नौदलातील १५० हून अधिक जहाजे नष्ट केली आहेत, ज्यात सर्व जमरान-श्रेणीच्या फ्रिगेट्सचा समावेश आहे. आम्ही त्यांच्या संरक्षण औद्योगिक तळावर एक मोठी मोहीम राबवत आहोत, ज्यात कारखाने, गोदामे, अण्वस्त्र संशोधन आणि विकास प्रयोगशाळा, तसेच त्यांची युद्धक्षमता पुन्हा उभारण्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांचा समावेश आहे.

होर्मुझला जा आणि तेल मिळवा- डोनाल्ड ट्रम्प

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी 'ट्रुथसोशल'वरील एका पोस्टमध्ये, होर्मुझच्या सामुद्रधुनीमुळे तेल आणि जेट इंधनाच्या तुटवड्याचा सामना करणाऱ्या देशांना कडक इशारा दिला होता. "ज्या देशांना होर्मुझची सामुद्रधुनी बंद असल्यामुळे जेट इंधन मिळत नाही, त्यांना मी अमेरिकेकडून खरेदी करण्याचा सल्ला देतो. आमच्याकडे ते भरपूर आहे," असे ट्रम्प यांनी लिहिले. आणि माझा दुसरा सल्ला आहे की, थोडे धाडस दाखवा, सामुद्रधुनीला जा आणि तेल ताब्यात घ्या," असेही ट्रम्प यांनी लिहिले.

Web Title : ट्रम्प की 'विनाशकारी' योजना तैयार! ईरान में ग्राउंड ऑपरेशन के संकेत

Web Summary : अमेरिका ने ईरान संघर्ष ट्रम्प की शर्तों पर समाप्त होने की चेतावनी दी। सैन्य कार्रवाई तेज, नौसेना संपत्तियों और बुनियादी ढांचे को लक्षित। ट्रम्प ने ईंधन की कमी वाले देशों को अमेरिका से खरीदने या तेल जब्त करने की सलाह दी।

Web Title : Trump's 'Devastating' Plan Ready! Hints at Iran Ground Operation

Web Summary : US warns Iran conflict will end on Trump's terms. Military action intensifies, targeting naval assets and infrastructure. Trump advises countries facing fuel shortages to buy from US or seize oil.