हॉर्मूजमार्गे जाणाऱ्या तेलवाहू जहाजांना सुरक्षा पुरवणार; डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 15:24 IST2026-03-04T15:24:10+5:302026-03-04T15:24:22+5:30

जागतिक ऊर्जा पुरवठा सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न!

Donald Trump's big announcement: Will provide security to oil tankers passing through the Strait of Hormuz | हॉर्मूजमार्गे जाणाऱ्या तेलवाहू जहाजांना सुरक्षा पुरवणार; डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा

हॉर्मूजमार्गे जाणाऱ्या तेलवाहू जहाजांना सुरक्षा पुरवणार; डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा

Iran-Israel-America Conflict: मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समुद्री व्यापाराच्या सुरक्षेसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर पोस्ट करत सांगितले की, अमेरिकेने गल्प प्रदेशातून होणाऱ्या व्यापारासाठी विशेष राजकीय जोखीम विमा (Political Risk Insurance) आणि आर्थिक हमी देण्याचा निर्णय घेतला आहे.

जहाज वाहतुकीसाठी आर्थिक सुरक्षा

ट्रम्प यांनी आपल्या पोस्टद्वारे सांगितले की, अमेरिकेची युनायटेड स्टेट्स डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन (DFC) ही संस्था जहाज वाहतुकीसाठी वाजवी दरात राजकीय जोखीम विमा आणि आर्थिक हमी उपलब्ध करून देईल. हा संरक्षणात्मक आर्थिक उपाय गल्पमधून होणाऱ्या सर्व समुद्री व्यापारासाठी, विशेषतः ऊर्जा वाहतुकीसाठी लागू असेल. याचा फायदा सर्व शिपिंग कंपन्यांना मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हॉर्मूज सामुद्रधुनीत टँकर्सना नौदलाची सुरक्षा

परिस्थिती गंभीर झाल्यास अमेरिकन नौदल तेलवाहू जहाजांना (टँकर्सना) हॉर्मूज सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे बाहेर निघण्यास मदत करेल, अशीही घोषणा ट्रम्प यांनी केली. या निर्णयाचा उद्देश जागतिक ऊर्जा पुरवठा अखंड ठेवणे हा असल्याचे त्यांनी सांगितले.

जागतिक ऊर्जा पुरवठा सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न

ट्रम्प यांच्या मते, अमेरिका कोणत्याही परिस्थितीत जगभरात ऊर्जा पुरवठ्याचा मुक्त प्रवाह (Free Flow of Energy) कायम ठेवण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलेल. त्यांनी असेही नमूद केले की, अमेरिकेची आर्थिक आणि लष्करी ताकद जगातील सर्वात मोठी आहे आणि गरज पडल्यास आणखी उपाययोजना केल्या जातील.

Web Title : ट्रंप ने होर्मुज जलडमरूमध्य में तेल टैंकरों के लिए सुरक्षा का वादा किया।

Web Summary : ट्रंप ने घोषणा की कि अमेरिका खाड़ी क्षेत्र में समुद्री व्यापार, विशेष रूप से ऊर्जा परिवहन के लिए राजनीतिक जोखिम बीमा और वित्तीय गारंटी प्रदान करेगा। अमेरिकी विकास वित्त निगम किफायती बीमा प्रदान करेगा। नौसेना होर्मुज जलडमरूमध्य में टैंकरों की सहायता करेगी, जिससे वैश्विक ऊर्जा आपूर्ति सुनिश्चित होगी।

Web Title : Trump pledges security for oil tankers in Hormuz Strait.

Web Summary : Trump announced the US will provide political risk insurance and financial guarantees for maritime trade, especially energy transport, in the Gulf region. The US Development Finance Corporation will offer affordable insurance. The Navy will assist tankers in the Hormuz Strait, ensuring global energy supplies.