शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

अखेर ट्रम्प यांनी 'तो' निर्णय घेतलाच; अमेरिकेत १५२ वर्षांनंतर प्रथमच 'असं' घडणार

By कुणाल गवाणकर | Published: January 08, 2021 11:34 PM

कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच डोनाल्ड ट्रम्प यांना पदावरून दूर केलं जाण्याची शक्यता

वॉशिंग्टन: अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी काल अमेरिकन संसदेत प्रचंड गोंधळ घातला. ट्रम्प यांनी सुरुवातीला त्यांच्या या गोंधळी समर्थकांची पाठराखण केली. त्यामुळे जगभरातून ट्रम्प यांच्या वर्तणुकीवर टीका झाली. फेसबुक, इन्स्टाग्रामनं ट्रम्प यांच्या कथित चिथावणीखोर पोस्ट काढून टाकल्या आणि ट्रम्प यांची खाती अनिश्चित काळासाठी बंद केली. जगभरातून टीका झाल्यानंतर ट्रम्प यांनी संसद परिसरात झालेल्या गोंधळाबद्दल नाराजी व्यक्त केली.ट्रम्प समर्थकांचा राडा, अमेरिकी संसद धरली चार तास वेठीससमर्थकांनी घातलेल्या गोंधळामुळे संपूर्ण जगातून डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जोरदार टीका झाली. त्यानंतर आता ट्रम्प यांनी २० जानेवारीला होणाऱ्या शपथविधीला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे ज्यो बायडन २० जानेवारीला अध्यक्षपदाची शपथ घेतली. या सोहळ्याला आपण जाणार नसल्याची माहिती ट्रम्प यांनी ट्विट करून दिली आहे. मावळते अध्यक्ष आपल्या उत्तराधिकाऱ्याच्या शपथविधीला अनुपस्थित राहिल्याचा प्रकार याआधी अमेरिकेत १८६९ मध्ये घडला होता. त्यावेळी एँड्यू जॉन्सन नव्या अध्यक्षांच्या शपथविधी सोहळ्याला अनुपस्थित राहिले होते."... लाज वाटायला हवी," अमेरिकेतील हिंसक आंदोलनादरम्यान तिरंगा दिसल्यानं शिवसेना खासदाराचा संतापमावळत्या अध्यक्षांनी नव्या अध्यक्षांच्या शपथविधीला अनुपस्थित राहण्याचा प्रकार गेल्या १५२ वर्षांत अमेरिकेत घडलेला नाही. २०१७ मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीला तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा उपस्थित राहिले होते. ओबामांनी २००९ मध्ये अध्यक्ष पदाची सूत्रं हाती घेतली. त्यावेळी मावळते अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश सोहळ्याला उपस्थित होते. अमेरिकेतील सत्तासंघर्षावर रामदास आठवले साधणार ट्रम्प यांच्याशी संवाद ट्रम्प यांच्या कार्यकर्त्यांनी अमेरिकेच्या संसदेत धुडगूस घातल्यानं ट्रम्प यांचा अध्यक्षीय कार्यकाळ संपण्यापूर्वीच त्यांना पदावरून दूर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. काही सिनेटर्सदेखील ट्रम्प यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच त्यांना पदावरून काढून टाकण्यासाठी प्रयत्न करू लागले आहेत. सीएनएननं दिलेल्या वृत्तानुसार, ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोगाची प्रक्रिया सुरू केली जाऊ शकते. त्यामुळे सीनेट त्यांना भविष्यात फेडरल ऑफिसमध्ये येण्यापासून रोखू शकते. सीनेटनं विरोधात मतदान केल्यास ट्रम्प कायमचे अपात्र ठरतील. तशी तरतूद अमेरिकेच्या घटनेत आहे.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाFacebookफेसबुकInstagramइन्स्टाग्राम