ट्रम्प यांच्या इशाऱ्याला केराची टोपली; इराणचे इस्रायलवर जोरदार हल्ले, युद्ध चिघळण्याची चिन्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 09:48 IST2026-04-02T09:44:30+5:302026-04-02T09:48:18+5:30

America Iran War: युद्धाबाबत ट्रम्प यांनी अमेरिकेला संबोधित करताच इराणने इस्रायवर क्षेपणास्त्र डागले.

donald trump warning is neglected iran heavy attack on israel signs of war escalating | ट्रम्प यांच्या इशाऱ्याला केराची टोपली; इराणचे इस्रायलवर जोरदार हल्ले, युद्ध चिघळण्याची चिन्हे

ट्रम्प यांच्या इशाऱ्याला केराची टोपली; इराणचे इस्रायलवर जोरदार हल्ले, युद्ध चिघळण्याची चिन्हे

America Iran War: अमेरिका इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचे पुढे काय होणार, या विवंचनेत जगभरातील देश असताना अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेला संबोधित केले. अमेरिकेला संबोधित करताना डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला स्पष्ट शब्दांत इशारा दिला. परंतु, ट्रम्प यांचे संबोधन संपताच इराणने इस्रायलवर जोरदार हल्ले चढवले. त्यामुळे युद्धाची स्थिती आणखीन चिघळण्याची चिन्हे असल्याचे म्हटले जात आहे. 

इराणने होर्मूझची समुद्रधुनी तेल वाहतुकीसाठी खुली केली नाही, तर त्याच्या अणुकेंद्रांवर थेट हल्ले चढवले जातील. आम्हाला होर्मुझ मार्गाची काहीही गरज नाही. ज्या देशांना याची गरज आहे. त्यांनी याचे संरक्षण करायला हवे. पडद्याआड कुटनितिक चर्चा सुरू असली तरी, आगामी दोन-तीन आठवड्यांत आपण इराणवर अत्यंत घातक हल्ले चढवणार आहोत. इराणच्या पायाभूत सुविधांनाही आता लक्ष्य केले जाईल, असा स्पष्ट इशारा ट्रम्प यांनी दिला. 

संघर्ष संपण्याऐवजी चिघळण्याची चिन्हे वाढली

अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेले युद्ध अधिक धोकादायक वळण घेत असल्याचे दिसत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणानंतर लगेचच इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ले केले, यावरून हे स्पष्ट झाले आहे की हा संघर्ष अजून संपलेला नाही, उलट तो अधिक तीव्र होऊ शकतो. इस्रायल लष्कराच्या म्हणण्यानुसार, ट्रम्प यांचे भाषण संपल्यानंतर लगेचच इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्र डागले. धोका टाळण्यासाठी संरक्षण यंत्रणा सक्रिय करण्यात आली असून क्षेपणास्त्र रोखण्याची कारवाई सुरू आहे. अनेक भागांतील हवाई संरक्षण यंत्रणांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला.

दरम्यान, अमेरिकेची इराणवरील लष्करी कारवाई दोन ते तीन आठवड्यांत संपण्याची शक्यता आहे, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी म्हटले होते. तेलाची वाहतूक व अन्य गोष्टींसाठी होर्मुझ सामुद्रधुनीवर अवलंबून आहेत, त्या देशांची या मार्गाच्या देखभालीची जबाबदारी असणार आहे. दुसरीकडे इराणने पहाटे कतारच्या किनाऱ्याजवळील एका तेल टँकरवर तसेच कुवेत आंतरराष्ट्रीय विमानतळावर हल्ला केला. संभाव्य युद्धविरामाबाबत अमेरिकेशी थेट संपर्क झाल्याची पहिल्यांदाच कबुली दिली.

 

Web Title : ट्रम्प की चेतावनी को अनसुना कर ईरान ने इस्राइल पर हमला किया: युद्ध बढ़ा

Web Summary : ट्रम्प की चेतावनी को दरकिनार करते हुए, ईरान ने इस्राइल पर हमला किया, जिससे संघर्ष बढ़ गया। ट्रम्प के संबोधन के बाद ईरान द्वारा इस्राइल को निशाना बनाने से तनाव बढ़ गया, जिससे और अस्थिरता का संकेत मिलता है।

Web Title : Iran Defies Trump's Warning, Attacks Israel: War Escalates

Web Summary : Ignoring Trump's warning, Iran launched attacks on Israel, escalating conflict. Tensions rise as Iran targets Israel post-Trump's address, signaling further instability. Military action looms.