शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
3
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
4
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
5
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
6
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
7
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
8
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
9
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
10
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
11
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
12
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
13
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
14
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
15
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
16
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
17
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
18
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
19
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप
20
शेअर बाजारात 'रेड अलर्ट'! 'या' ६ कारणांमुळे सेन्सेक्स-निफ्टी आपटले; तुमच्या पैशांचं काय झालं?

'एपस्टाईन फाइल'मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव; मस्क यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांवर टाकला मोठा बॉम्ब

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 08:46 IST

Donald Trump vs Elon Musk: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि टेस्लाचे मालक इलॉन मस्क यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचा फैरी झडताना दिसत आहेत.

Epstein Files: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि टेस्लाचे मालक इलॉन मस्क यांच्यातील कट्टर मैत्री आता उघड शत्रुत्वात बदलली आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी मस्क यांच्या कंपन्यांना सरकारी करार आणि अनुदान देणे बंद करण्याची धमकी दिली. त्यानंतर मस्क यांनी ट्रम्प यांच्या महाभियोगाशी संबंधित एका पोस्टचे समर्थन केलं. त्यावरुन आता ट्रम्प यांना पदावरून हटवण्यासाठी मस्क यांनी कंबर कसल्याची चर्चा सुरु झालीय. अशातच मस्क यांनी ट्रम्प यांच्याबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे.  डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव एपस्टाईन फाइलमध्ये असल्याचा आरोप इलॉन मस्क यांनी केला.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अब्जाधीश इलॉन मस्क यांच्यातील वाद वाढत चालला आहे. दोघांनीही एकमेकांवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केलीय. आता हे प्रकरण इतके टोकाला पोहोचले आहे की मस्क यांनी ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालवण्याची मागणी केली आहे. तसेच एक्स पोस्टमध्ये मस्क यांनी  दावा केला  की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव एपस्टाईन फाइल्समध्ये आहे, म्हणूनच त्या जाहीर केल्या जात नाहीत. मस्क यांनी ट्रम्प यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर आता हे प्रकरण कुठपर्यंत जाणार पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

"खरोखरच मोठा बॉम्ब टाकण्याची वेळ आली आहे.. डोनाल्ड ट्रम्प एपस्टाईन फाइल्समध्ये आहेत. ते सार्वजनिक न होण्याचे खरे कारण हेच आहे. तुमचा दिवस चांगला जावो, डीजेटी! भविष्यासाठी ही पोस्ट लक्षात ठेवा. सत्य बाहेर येईल," अशी एक्स पोस्ट इलॉन मस्क यांनी केली आहे. यासोबत मस्क यांनी ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालवण्याची आणि त्यांच्या जागी जेडी व्हान्स यांना अध्यक्ष बनवण्याची मागणी करणारी पोस्टही शेअर केलीय. मस्क यांनी आरोप केलेला जेफ्री एपस्टाईन हा एक अमेरिकन फायनान्सर होता ज्याने अब्जाधीशांसाठी निधी जमवून अफाट संपत्ती जमवल्याचा आरोप आहे. या काळात त्याने माजी अमेरिकन राष्ट्रपती, ब्रिटिश राजघराणे आणि प्रमुख हॉलिवूड सेलिब्रिटींसह महत्त्वाच्या व्यक्तींशी संबंध निर्माण केले होते.

एपस्टाईन फाइल्स प्रकरण काय?

जेफ्री एपस्टाईनचे नाव अमेरिकेत एक  कुख्यात गुन्हेगार म्हणून नोंदवले गेले आहे. एपस्टाईन हा मुलांचे लैंगिक शोषण आणि तस्करी करणारा गुन्हेगार आहे.  त्याच्यावर अल्पवयीन मुलांना वरिष्ठ राजकारणी, व्यावसायिक आणि सेलिब्रिटींकडे नेल्याचा आरोप आहे. त्यानंतर या मुलांचे तिथे लैंगिक शोषण करण्यात आले. एवढेच नाही तर डझनभर महिलांनी एपस्टाईन गंभीर आरोप केले आहेत. एपस्टाईन त्यांना चुकीच्या कामांसाठी अनेक मोठ्या हाय प्रोफाइल लोकांकडे पाठवले होते. यासाठी, एपस्टाईनचे खाजगी कॅरिबियन बेट आणि न्यू यॉर्क, फ्लोरिडा आणि न्यू मेक्सिकोमधील घरे यांचा वापर व्हायचा, असा आरोप महिलांनी केला होता.

२००५ मध्ये एका कुटुंबाने तक्रार केली होती की एपस्टाईनने त्यांच्या १४ वर्षांच्या मुलीचे लैंगिक शोषण केले होते. त्यानंतर फ्लोरिडा पोलिसांनी तपास सुरू केला. या तपासात धक्कादायक खुलासे झाले. एपस्टाईनने एकूण ३६ मुलींचे लैंगिक शोषण केल्याचे उघड झाले. २००८ मध्ये त्याला दोन प्रकरणांमध्ये दोषी ठरवण्यात आले आणि शिक्षा सुनावण्यात आली. मात्र १३ महिने तुरुंगात राहिल्यानंतर तो बाहेर आला होता. २०१९ मध्ये पुन्हा अटक झाल्यानंतर ऑगस्टमध्ये त्याने अमेरिकन तुरुंगात आत्महत्या केली ज्यामुळे या प्रकरणाचा तपास थांबवावा लागला.

दरम्यान, जेफ्री एपस्टाईनच्या गुन्ह्यांच्या चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक खुलासे झाले होते. तपासादरम्यान समोर आलेले कागदपत्रे, संपर्क यादी, कॉल रेकॉर्ड, चॅट, व्हिडिओ, त्याच्या सहकाऱ्यांची आणि क्लायंटची नावे एपस्टाईन फाइल्समध्ये नोंदवली गेली आहेत. अमेरिकन सरकार या प्रकरणाची चौकशी करत आहे. त्यामध्ये अनेक हायप्रोफाईल लोकांची नावे आहेत. अशातच मस्क यांनी ट्रम्प यांचे नाव या फाईलमध्ये असल्याचा आरोप केला आहे.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पelon muskएलन रीव्ह मस्कAmericaअमेरिका