अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांची काल अलास्कामध्ये झालेली भेट हा जगभरात चर्चेचा विषय ठरलेला आहे. जगातील दोन प्रमुख शक्तिशाली देशांच्या प्रमुखांमध्ये झालेली ही भेट कुठल्याही निर्णयाविना संपली. मात्र आता या भेटीबाबत वेगळीच चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना काल भेटलेले व्लादिमीर पुतीन हे खरे पुतीन नव्हते, तर त्यांच्यासारखा दिसणारा डुप्लिकेट होता असा दावा केला जात आहे.
हा दावा करणारे नेटिझन्स आपला दावा सिद्ध करण्यासाठी वेगवेगळी उदाहरणे देत आहेत. व्लादिमीर पुतीन हे सहसा आपल्या मनातील भाव चेहऱ्यावर उमटू देत नाहीत. तसेच कुठल्याही गोष्टीवर सहज प्रतिक्रिया व्यक्त करत नाहीत. मात्र अलास्कामध्ये आलेले व्लादिमीर पुतीन हे खूप सक्रिय दिसत होते. एवढंच नाही तर डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतीन यांच्यात झालेल्या भेटीचे व्हिडीओ हे अॅनिमेटेडट वाटत होते, असा दावाही केला जात आहे.
दरम्यान, रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी काल अलास्का येथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली होती. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा झाली होती. त्यात युक्रेनसोबतच्या युद्धविरामाच मुद्दा प्रमुख होता. मात्र दोन्ही नेत्यांमध्ये युद्धविरामाबाबत कुठलाही सकारात्मक निर्णय न झाल्याने ही बैठक कुठल्याही निर्णयाविना संपली. मात्र या बैठकीनंतर पुतीनबाबत करण्यात आलेल्या दाव्यामुळे दोन्ही शक्तिशाली नेत्यांमधील भेटीबाबत जगभरात वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.
काल डोनाल्ड ट्रम्प यांना भेटलेले पुतीन हे खोटे होते, असा दावा करणाऱ्यांनी आपल्या दाव्याला दुजोरा देण्यासाठी वेगवेगळी उदाहरणं दिली आहेत. त्यांनी सांगितले की, व्लादिमीर पुतीन सर्वसाधारणपणे आपले भावभावना क्वचितच व्यक्त करतात. मात्र काल ट्रम्प यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये ते खूपच सक्रिय दिसत होते. दरम्यान, व्लादिमीर पुतीन यांच्याबाबत असे दावे केले जाण्याची ही काही पहिलीच वेळ नाही आहे. तर मागच्या काही वर्षांमध्ये अनेक वृत्तांमधून असे दावे करण्यात आलेले आहेत. एवढंच नाही तर व्लादिमीर पुतीन यांच्याकडे सहा बॉडी डबल आहेत. त्यामधील प्रत्येक जण विशेष कार्य करतो. तसेच त्यातील प्रत्येकाचं विशिष्ट्य वैशिष्ट्य आहे.