शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

"तू म्हणालास, हे करूया म्हणून..."; ट्रम्प यांनी थेट संरक्षण मंत्र्यांच्या डोक्यावर फोडले इराण युद्धाचे खापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 09:05 IST

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरुद्धच्या युद्धाच्या ठिणगीचे खापर आता थेट संरक्षण मंत्र्यांवर फोडले आहे.

Donald Trump on Pete Hegseth: इराणसोबतच्या युद्धाला आता २८ दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र, हे युद्ध नेमके का सुरू झाले आणि त्याचा शेवट काय? या प्रश्नांवर अमेरिका अजूनही गोंधळलेलीच दिसत आहे. अशातच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता युद्धाच्या जबाबदारीचे खापर थेट आपल्या बाजूला बसलेल्या संरक्षण मंत्र्यांवर फोडल्याने सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलं आहे.

तेनेसी येथे आयोजित एका राऊंडटेबल बैठकीत ट्रम्प यांनी युद्धाच्या सुरुवातीचा एक नवा किस्सा सांगितला. ट्रम्प म्हणाले की, "आम्ही जेव्हा चर्चा करत होतो, तेव्हा सर्वात आधी पीटर हेगसेथ (संरक्षण मंत्री) पुढे आले आणि म्हणाले की, आपण हे करायलाच हवे. इराणकडे अण्वस्त्रे असू शकत नाहीत, हे त्यांचेच शब्द होते." महत्त्वाचे म्हणजे, ट्रम्प यांनी हे विधान केले तेव्हा हेगसेथ त्यांच्या अगदी बाजूलाच बसले होते.

"मी पीटरला फोन केला. मी जनरल केन यांना फोन केला. मी आपल्या अनेक कर्तबगार लोकांशी चर्चा केली. मी त्यांना म्हणालो मध्य पूर्वेमध्ये आपल्यासमोर एक मोठी समस्या उभी आहे. एकतर आपण ती तशीच राहू देऊ शकतो किंवा मग तिथे एक छोटीशी लष्करी मोहीम करून त्या मोठ्या समस्येचा कायमचा निकाल लावू शकतो," असेही ट्रम्प म्हणाले.

'लिटिल जर्नी' की महाभयंकर युद्ध?

ट्रम्प यांच्या मते, हे युद्ध म्हणजे केवळ एक छोटा प्रवास आहे, जो मध्य पूर्वेतील मोठी समस्या संपवण्यासाठी आखला गेला. मात्र, हा छोटा प्रवास आता अमेरिकेसाठी डोकेदुखी ठरत आहे. प्रशासनातील प्रत्येक जण युद्धाचे वेगळे कारण सांगत आहे. इस्रायल हल्ला करणारच होता, म्हणून अमेरिका युद्धात उतरली. इराण अण्वस्त्र डागण्याच्या तयारीत होता, म्हणून हा प्रतिबंधात्मक हल्ला होता अशी कारणे आता समोर येत आहेत.

जेडी व्हान्स नाराज?

या युद्धावरून ट्रम्प प्रशासनात सर्व काही ठीक नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स हे या युद्धाबाबत फारसे उत्साही नव्हते, अशी कबुली खुद्द ट्रम्प यांनीच दिली आहे. तसेच, नॅशनल काउंटरटेररिझम सेंटरचे प्रमुख जो केंट यांनी तर युद्धाच्या निषेधार्थ राजीनामाच दिला आहे. दुसरीकडे, बेंजामिन नेतन्याहू आणि रूपर्ट मर्डोक यांसारख्या बाहेरील व्यक्तींच्या सल्ल्याने हे युद्ध लादले गेल्याची चर्चा आता अमेरिकेत जोर धरू लागली आहे.

बॉम्ब टाकतच राहू - डोनाल्ड ट्रम्प

युद्धाच्या काळातही ट्रम्प यांनी चर्चेचे दरवाजे उघडे असल्याचे म्हटले आहे. "आम्हाला करार करायला आवडेल. जर चर्चा यशस्वी झाली तर युद्ध थांबवू, नाहीतर आमची इच्छा असेपर्यंत आम्ही बॉम्बफेक सुरूच ठेवू," असे खळबळजनक विधान ट्रम्प यांनी केले आहे. दरम्यान, ट्रम्प यांचे जावई जेरेड कुश्नर हे इराणच्या टॉप नेत्यांशी संपर्कात असल्याचा दावा अमेरिकेने केला आहे, तर इराणने अशा कोणत्याही चर्चेचा स्पष्ट इन्कार केला आहे.

इराणला दिलेली डेडलाईन ट्रम्प यांनी ५ दिवसांनी वाढवली आहे. तसेच आतापर्यंत १३ अमेरिकन सैनिकांचा या युद्धात मृत्यू झाला आहे. इराणचे क्षेपणास्त्र कार्यक्रम आणि ड्रोन निर्मिती पूर्णपणे उद्ध्वस्त करणे, हे अमेरिकेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

दरम्यान, युद्ध लांबत चालल्याने आता ट्रम्प प्रशासनावर दबाव वाढत आहे. पाच दिवसांची वाढीव मुदत संपल्यानंतर अमेरिका इराणवर आणखी मोठे हल्ले करणार की पडद्यामागून सुरू असलेल्या चर्चेतून काही तोडगा निघणार, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Trump Blames Defense Secretary for Iran War, Stirs Controversy

Web Summary : Trump shifts blame for the Iran war onto his Defense Secretary, Pete Hegseth, claiming Hegseth pushed for it. The war's purpose is debated within the administration, with rising dissent and casualties. Negotiations continue amid threats of continued bombing.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाIranइराण