ट्रम्पनी H-1B फीवरून ब्लॅकमेल केले, अमेरिकी कंपनीने भारतातच १२,००० नोकऱ्यांची घोषणा केली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 15:02 IST2025-09-25T15:01:55+5:302025-09-25T15:02:22+5:30
Big IT Company Job Alert: सर्वाधिक भारतीय ज्या एच-वनबी व्हिसाचा वापर करतात त्या व्हिसावरील शुल्क ट्रम्प यांनी ८८ लाख करत भारतीयांना अमेरिकेत जाण्यापासून रोखण्याची प्लॅनिंग सुरु केले आहे.

ट्रम्पनी H-1B फीवरून ब्लॅकमेल केले, अमेरिकी कंपनीने भारतातच १२,००० नोकऱ्यांची घोषणा केली...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कमी बिझनेसमन जास्त असलेले डोनाल्ड ट्रम्प हे स्वत:च्या फायद्यासाठी पाकिस्तानशी सलगी करत भारताला कोणत्या कोणत्या मार्गाने अडचणीत आणता येईल याचा बंदोबस्त करण्यात गुंतले आहेत. परंतू, त्यांना अमेरिकीच कंपन्या नाकावर टिच्चून सपशेल अपयशी ठरवत आहेत. सर्वाधिक भारतीय ज्या एच-वनबी व्हिसाचा वापर करतात त्या व्हिसावरील शुल्क ट्रम्प यांनी ८८ लाख करत भारतीयांना अमेरिकेत जाण्यापासून रोखण्याची प्लॅनिंग सुरु केलेली असताना अमेरिकेतील सर्वात मोठ्या टेक जायंट कंपन्यांपैकी एक असलेल्या एक्सेंचरनेने भारतातच १२००० नोकऱ्या देणार असल्याची घोषणाच करून टाकली आहे.
अमेरिकेती आयटी कंपन्यांमध्ये मोठी खळबळ उडालेली आहे. ट्रम्प यांनी कामासाठी लागणारा व्हिसाची रक्कम वाढविल्याने या कंपन्यांनी भारतीयांना आम्ही अमेरिकेत आणू शकत नसलो तर काय झाले, आम्ही भारतात जाऊन तिथेच त्यांना नोकऱ्या देऊ शकतो, अशीच भूमिका घेतली आहे. यामुळे ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून या कंपनीने भारतात हजारो नोकऱ्या देणार असल्याची घोषणा केली आहे.
एक्सेंचरने ने आंध्र प्रदेशमध्ये नवीन कॅम्पस उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार या ठिकाणी जवळपास १२००० नोकऱ्या उपलब्ध होणार असल्याचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे. अमेरिकेने २१ सप्टेंबर रोजी एच-१बी व्हिसावर वार्षिक १००,००० डॉलर्स शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला असतानाच हे पाऊल उचलण्यात आले आहे. एक्सेंचरने विशाखापट्टणममध्ये आंध्र प्रदेश सरकारकडून सुमारे १० एकर जमीन मागितली आहे.
काही महिन्यांपूर्वी ट्रम्प यांनी अॅप्पल या दिग्गज कंपनीला भारतात उत्पादन सुरु करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला होता. तरीही अॅप्पलने भारतातच उत्पादन प्रकल्प उभारण्याची घोषणा केली होती. आता इतरही टेक कंपन्या अमेरिकेतून आपला डोलारा भारतात हलविण्याची शक्यता निर्माण झाली आहे.