डोनाल्ड ट्रम्प यांच्या बदलत्या स्वभावामागे एस्पिरिनचा ओव्हरडोस? अतिवापरामुळे विचित्र वागत असल्याची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 12:55 IST2026-01-10T12:54:45+5:302026-01-10T12:55:23+5:30
Donald Trump Health & Aspirin Overdose: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एस्पिरिन औषधाचा ओव्हरडोज घेत आहेत. याचा त्यांच्या स्वभावावर आणि जागतिक निर्णयांवर काय परिणाम होत आहे? वाचा सविस्तर विश्लेषण.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या बदलत्या स्वभावामागे एस्पिरिनचा ओव्हरडोस? अतिवापरामुळे विचित्र वागत असल्याची चर्चा
वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे लहरी वागणे, जागतिक नेत्यांची थट्टा उडवणे आणि वारंवार भूमिका बदलणे यामागे केवळ त्यांचा स्वभाव नसून, ते घेत असलेल्या औषधांचा 'ओव्हरडोज' कारणीभूत असल्याची धक्कादायक शक्यता समोर आली आहे. गेल्या दोन दशकांपासून ट्रम्प हे रक्त पातळ करण्यासाठी 'एस्पिरिन' या औषधाचे प्रमाणाबाहेर सेवन करत आहेत. त्याचे दुष्परिणाम आता त्यांच्या वागणुकीतून दिसत असल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे.
'न्यू यॉर्क टाइम्स'ने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, ७९ वर्षीय ट्रम्प यांना त्यांच्या वैद्यकीय पथकाने एस्पिरिनचा डोस कमी करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, ट्रम्प यांनी हा सल्ला धुडकावून लावला आहे. सामान्यतः गरज असलेल्या डोसपेक्षा ते सुमारे ४ पट जास्त (३२५ मिलीग्राम) औषध रोज घेतात. यावर त्यांनी "मला माझ्या हृदयात जाड रक्त नको आहे," अशी भूमिका त्यांनी 'द वॉल स्ट्रीट जर्नल'ला दिलेल्या मुलाखतीत मांडली होती.
ट्रम्प यांना नसांतून रक्त हृदयाकडे पोहोचण्यास अडथळा येणे हा आजार आहे. त्यांच्या हातावर रक्ताचे साचल्याचे देखील दिसले होते. एस्पिरिन रक्त पातळ करते, परंतु ७० वर्षांवरील व्यक्तींमध्ये याचे रोजचे सेवन अंतर्गत रक्तस्त्राव किंवा ब्रेन हॅमरेजचा धोका वाढवते.
तज्ज्ञांचे धक्कादायक निरीक्षण
एस्पिरिनचा ओव्हरडोज केवळ शरीरावरच नाही, तर मेंदूवरही परिणाम करतो. संशोधनानुसार, या औषधाच्या अतिसेवनामुळे मोठे मानसिक बदल दिसू शकतात. यामध्ये चिडचिडेपणा आणि गोंधळ सतत अस्वस्थ वाटणे आणि निर्णयांमध्ये गोंधळ होणे. मानसिक आरोग्य खालावणे आणि विनाकारण नैराश्य येणे. संवाद साधताना विचित्र चेहरे करणे किंवा लक्ष विचलित होणे.
जागतिक चिंतेचा विषय
एका महासत्तेच्या राष्ट्राध्यक्षाचे मानसिक आरोग्य आणि त्यांचे वर्तन हा केवळ वैयक्तिक प्रश्न उरलेला नाही. ट्रम्प यांच्या लहरी निर्णयांचा परिणाम जागतिक अर्थकारण आणि राजकारणावर होत आहे. एस्पिरिनच्या प्रभावामुळे जर त्यांचे मानसिक संतुलन ढळत असेल, तर हे संपूर्ण जगासाठी धोक्याचे असल्याचे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे.